अवैध वाळू साठ्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 02:59 PM2019-08-02T14:59:47+5:302019-08-02T15:01:33+5:30
सटाणा : वाढता वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाने कठोर पावले उचलली आहेत .बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी आज शुक्र वारी (दि.२) ठेंगोडा येथे अवैध वाळू साठयावर छापा टाकून जप्त करण्यात आला.
सटाणा : वाढता वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाने कठोर पावले उचलली आहेत .बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी आज शुक्र वारी (दि.२) ठेंगोडा येथे अवैध वाळू साठयावर छापा टाकून जप्त करण्यात आला.सुमारे वीस ब्रास वाळू साठा आहे. या अवैध साठा करणाऱ्या वाळू माफियाचा शोध सुरु असून त्याच्या विरु द्ध कारवाई करण्यात येणार आहे .या कारवाईमुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे .
बागलाण तालुक्यात वाढत्या वाळू उपशामुळे पाण्याचे मोठ्याप्रमाणात दुर्भिक्ष निर्माण झाले आहे .भीषण टंचाईमुळे प्रशासनाची मोठी कसरत होत आहे.यावर तोडगा म्हणून बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील बेसुमार वाळू उपसा रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत .विनापरवाना कोणत्याही ठिकाणी वाळूचा साठा आढळून आल्यास वाहतूक करणारा व विकत घेणार्यावर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे .आज शुक्र वारी तालुक्यातील ठेंगोडा सूतिगरणी आवारात वाळू माफियांनी वाळूचा अवैध साठा केल्याची माहिती मिळाली होती .तहसीलदार इंगळे पाटील , तलाठी नितीन मेधने ,जयप्रकाश सोनवणे यांनी दुपारी छापा टाकून सुमारे वीस ब्रास वाळू जप्त केली .