कसबे-सुकेणेत अवैध धंद्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:42 PM2019-09-10T22:42:47+5:302019-09-10T22:43:05+5:30
कसबे सुकेणे : येथील जुगार, मटका यासारख्या अवैध धंद्यांवर सोमवारी दुपारनंतर पोलिसांनी छापेमारी करत संशयित जुगारी व मटका खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी ’लोकमत’मध्ये ‘कसबे सुकेणेत अवैध धंद्यांना ऊत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून चौकशी होऊन ही कारवाई झाल्याचे समजते.

कसबे सुकेणे शहरात गेल्या काही दिवसांपासून जुगार, मटका यासारख्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला होता. शहरातील गुन्हेगारीचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण चिंताजनक होते. कसबे सुकेणेत पोलिसांचा धाक उरला की नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत होते. गावातील धनंजय भंडारे, दत्ता पाटील यांनी याबाबत निवेदन दिले होते. सोमवारी दुपारनंतर पोलिसांनी शहरातील दोन ते तीन ठिकाणी छापेमारी करीत संशयित जुगारी व अवैध धंदे चालविणाऱ्यांना ताब्यात घेतले. अचानक झालेल्या कारवाईमुळे कसबे सुकेणे शहरात चर्चेला उधाण आले. प्रतिष्ठितांसह अनेकांची पळापळ झाली. संध्याकाळी उशिरापर्यंत ताब्यात घेतलेल्या जुगाºयांवर गुन्हे नोंदविण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कसबे सुकेणेतून स्वागत होत आहे. टवाळखोर धूमस्टाइल गाड्या चालविणारे महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक तसेच शहरात, हायस्कूल रस्ता, बसस्थानक भागातील टवाळखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.