बॉल बॅडमिंटन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 06:12 PM2018-11-13T18:12:48+5:302018-11-13T18:14:11+5:30
६४वी राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात सुरू झाल्या असून, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
देवळा : येथे ६४वी राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात सुरू झाल्या असून, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात प्रथमच राज्यस्तरीय खुल्या स्पर्धा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये स्पर्धेप्रती उत्सुकता दिसून येत आहे. शहरातील किशोर बापू क्र ीडा मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत.
राज्यातून मुंबई, लातूर, अहमदनगर, वर्धा, पुणे, नाशिक ग्रामीण, गडचिरोली, औरंगाबाद, ठाणे, अकोला, सांगली, रायगड, नवी मुंबई, सब अर्बन मुंबई, अमरावती, नागपूर, पालघर, अमरावती ग्रामीण, चंद्रपूर, परभणी, वाशिम, बुलडाणा, पिंपरी चिंचवड, भंडारा आदी २५ संघ स्पर्धेत सहभागी झाले असून, त्यांचे चार गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील विजेता व उपविजेता संघ उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. स्पर्धा १२ ते १४ नोव्हें. अशा तीन दिवस होणार आहे. सहभागी खेळाडू, प्रशिक्षक, आदी ३०० जणांची भोजन व निवासाची सोय जिल्हा परिषद विद्यानिकेतन देवळा येथे करण्यात आली असून, त्या परिसराला
क्र ीडानगरी निर्माण झाली आहे. या सर्वांची व्यवस्था ठेवण्यासाठी आयोजक परिश्रम घेत आहेत.
महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशन संलग्न नाशिक ग्रामीण बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक ग्रामीण बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संभाजी अहेर, सचिव तुषार देवरे, पवन देवरे, नितीन देवरे, ईश्वर वाघ, सुनील देवरे, उमेश अहेर, दिलीप गुंजाळ, प्रा. नितीन गुंजाळ, मनीष देवरे, उमेश अहेर आदी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.