सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 03:17 PM2019-11-29T15:17:20+5:302019-11-29T15:18:54+5:30
सुरगाणा : अमरावतीच्या बोरगाव मंजूजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या नाशिक विभागातील संघ, सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, गुरुवारी (दि.२८) संध्याकाळी जखमींना योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. या अपघातातून बचावलेल्या खेळाडूंनी स्पर्धेतील उपान्त्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली आहे.
सुरगाणा : अमरावतीच्या बोरगाव मंजूजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या नाशिक विभागातील संघ, सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, गुरुवारी (दि.२८) संध्याकाळी जखमींना योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. या अपघातातून बचावलेल्या खेळाडूंनी स्पर्धेतील उपान्त्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली आहे.
सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील खा- खो चा संघ अमरावती येथे राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन जीपमधून जात असताना बोरगाव मंजूजवळ खेळाडूंच्या एका जीपला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली होती. त्यामुळे झालेल्या अपघातात इयत्ता आठवीत शिकणारे विद्यार्थी कल्पेश सहारे (रा. धामणकुंड), प्रभाकर धूम (हातरु ंडी), तर शिक्षक टी.आर. गावित, एम.डी. पवार, जीप चालक सुरेश गावित (अलंगुण) हे जखमी झाले होते. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या पाच जखमींवर उपचार करण्यात आले. सद्यस्थितीत या सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्यांच्यासोबत असलेले क्रीडाशिक्षक एन. एस. तायडे यांनी दिली.
या अपघातात सुखरूप असलेल्या उर्वरित खेळाडूंनी स्पर्धेत उत्तम खेळ केला. दडपण असूनही या खेळाडूंनी अमरावती विरोधात असलेला पहिलाच सामना अलंगुण संघाने म्हणजे नाशिक विभागाने दोन गुणांनी विजय संपादन केला. त्यानंतर सेमी फायनलमध्ये मुंबई संघाविरु द्ध दणदणीत विजय संपादन केला असून, शुक्रवारी (दि. २९) लातूर संघाविरु द्ध अंतिम फेरीचा सामना होणार आहे. मोठा अपघात होऊनही या खेळाडूंनी अपघाताचे दडपण न ठेवता अंतिम सामन्यापर्यंत बाजी मारलीआहे.
अलंगुण येथील आदर्श समता शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक व माजी आमदार जे.पी. गावित यांचे सुपुत्र हिरामण गावित यांना अपघाताचे वृत्त समजताच थेट अमरावतीमधील अकोला गाठून अपघातातील सर्वांची आपुलकीने विचारपूस केली. हिरामण गावित यांच्यासह प्राचार्य के. एल. वाघचौरे, शिक्षक एन.जी. लांडगे, रामभाऊ थोरात, बाळू गावित, एन.एस. तायडे हे त्यांच्यासोबत असून, रु ग्णालयातून पाचही जणांना सोडण्यात आल्यानंतर त्यांना घरी घेऊन निघाले होते.
अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अकोला प्रकल्प अधिकारी हिवाळे तसेच जिल्हा क्र ीडा अधिकारी यांनी रु ग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.उर्वरित सर्व मुले सुखरूप असून, अमरावती येथे स्पर्धेत खेळत आहे. चिंतामण चौधरी (रा. बाफळून), मच्छिंद्र वाघमारे (रा. कुकुडमुंडा), श्याम गायकवाड (रा. कोठूला), किरण जाधव (रा. तोरडोंगरी), रोशन सहारे (धामणकुंड), उत्तम गवळी (गाळबारी), चेतन चौधरी (धुरापाडा), कौशिक चौधरी (बाफळून), श्याम गायकवाड (वांगण), नीलेश भुसारे (तोरडोंगरी) अशी त्यांची नावे आहेत.