नामपूर बाजार समितीत कांदा भावात सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 06:04 PM2018-09-02T18:04:28+5:302018-09-02T18:04:46+5:30
नामपूर : येथील कृषी उप्पन बाजार समितीत मागील आठवड्यात घसरलेल्या कांद्याच्या भावात थोडीशी सुधारणा होऊन भाववाढ झाल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करीत आहेत.
नामपूर : येथील कृषी उप्पन बाजार समितीत मागील आठवड्यात घसरलेल्या कांद्याच्या भावात थोडीशी सुधारणा होऊन भाववाढ झाल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करीत आहेत.
नामपूर बाजार समितीत मागील आठवड्यात कांद्याचा बाजारभाव प्रति क्ंिवटल पाचशे ते सातशे रु पयांपर्यंत घसरल्यामुळे कांदा उत्पादक कमालीचा घाबरला होता; मात्र कांदा लिलावास सुरुवात झाली. यात चांगल्या मालास १०४० रुपये भाव मिळाला असून, सरासरी ९५० रुपये दराने कांदा विक्र ी झाला आहे. भाव वाढल्यामुळे उत्पादक समाधानी असल्याचे दिसून आले. बाजार समितीत आवक मोठ्या प्रमाणात दिसून आली. सुमारे ६१० वाहने माल विक्र ीस दाखल झाली होती. कांदा व्यापारी बंट नेरकर, सचिन मुथा, परेश कोठावदे, अजय नेर, जितेंद्र बडजादे, संजय येवला, अविनाश निकम, रत्नाकर नेरकर, किशोर पगार, नितीन अहिरे, बी.एस. भामरे, मनोज येवला हे बाजार समितीतील कांदा खरेदी करतात. मोसम खोऱ्यात यंदा मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले असून, आगामी काळातसुद्धा नामपूर बाजार समितीत आवक प्रचंड राहणार आहे. भावात कमी अधिक वाढ होण्याची शक्यता असून, कांदा उत्पादकांनी आपला माल प्रतवारी करून टप्प्याटप्प्याने विक्र ीस आणण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब भामरे, उपसभापती लखन पवार यांनी केले असून, उन्हाळी कांद्याला किमान पंधराशे रुपयांपर्यत भाव मिळणे अपेक्षित आहे, अशी भावना मोसम खोºयातील कांदा उत्पादकात दिसत आहे.