येवला बाजार समितीत कांदा भावात सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:57 PM2018-10-06T17:57:59+5:302018-10-06T17:58:14+5:30
आवक टिकून : सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव
येवला : येवला कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून असून, बाजारभावात थोडी सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. कांद्यास देशांतर्गत सर्वसाधारण मागणी राहिली. समितीत सप्ताहात एकूण ४४ हजार ८८९ क्विंटल कांदा आवक झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २५० ते १०५४ रुपये तर सरासरी ८५० रुपये प्रतिक्विंटल इतके राहिले. उपबाजार अंदरसूल येथेही कांद्याची एकूण २६ हजार १७२ क्विंटल आवक झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल इतके राहिले.
सप्ताहात गव्हाची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हाची एकूण आवक २६ क्विंटल झाली असून, बाजारभाव १११७ ते २२७१ रुपये तर सरासरी १८८५ रुपयांपर्यंत होते. बाजरीची एकूण आवक २३५ क्विंटल झाली असून, बाजारभाव १२२५ ते १६९० रुपये तर सरासरी १३८३ रुपयांपर्यंत होते. सप्ताहात हरभऱ्याची एकूण आवक १८ क्विंटल झाली असून, बाजारभाव २९०० ते ३८०० रुपये तर सरासरी ३४३४ रुपयांपर्यंत होते. मुगाच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. सप्ताहात मुगाची एकूण आवक १९८ क्विंटल झाली असून, बाजारभाव ३००० ते ५९२४ रुपये तर सरासरी ५ हजारापर्यंत होते. सप्ताहात सोयाबीनची एकूण आवक ५५१ क्ंिवटल झाली असून, बाजारभाव २६११ ते ३१११ रुपये तर सरासरी २९८० रुपयांपर्यंत होते. मक्यास व्यापारीवर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मक्याची एकूण आवक ३६१ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ११५१ ते १४८० रुपये तर सरासरी १३६१ रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत राहिल्याची माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.