टमाटा भावात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 06:41 PM2018-09-30T18:41:25+5:302018-09-30T18:41:51+5:30

गेल्या काही दिवसात टमाट्याच्या घसरलेल्या भावामुळे चिंताक्रांत झालेल्या उत्पादकांना आशेचा किरण दिसू लागला असून, बांगलादेश व दुबई या ठिकाणी टमाटा निर्यात होऊ लागल्याने भावात सुधारणा झाली आहे. मात्र पाकिस्तानात टमाट्यासाठी निर्यात खुली होण्याच्या प्रक्रि येची प्रतीक्षा उत्पादक करीत आहेत.

Improvement in Tomato Prices | टमाटा भावात सुधारणा

टमाटा भावात सुधारणा

Next
ठळक मुद्देआशा पल्लवित : दुबई, बांगलादेशात निर्यात

वणी : गेल्या काही दिवसात टमाट्याच्या घसरलेल्या भावामुळे चिंताक्रांत झालेल्या उत्पादकांना आशेचा किरण दिसू लागला असून, बांगलादेश व दुबई या ठिकाणी टमाटा निर्यात होऊ लागल्याने भावात सुधारणा झाली आहे. मात्र पाकिस्तानात टमाट्यासाठी निर्यात खुली होण्याच्या प्रक्रि येची प्रतीक्षा उत्पादक करीत आहेत.
दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर टमाटा लागवड करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी खुडणी सुरू आहे, तर काही भागात येत्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणावर टमाटा बाजारात येण्याच्या स्थितीत आहे. मागील वर्षी टमाटा उत्पादकांना चांगला व समाधानकारक भाव मिळाल्याने यावर्षी त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आलेली आहे.
दरम्यान आठवडाभरापूर्वी मातीमोल भावाने टमाटा विक्र ी करण्याची वेळ उत्पादकांवर आली. काहींनी रस्त्यावर टमाटे फेकले तर काहींनी गुरांना खाण्यास टाकले. उत्पादन खर्च तर लांबच राहिला, खुडणी व वाहतुकीचा खर्चही निघेनासा झाला. त्यामुळे टमाटा उत्पादक हतबल झाले.
लागवड ते उत्पादन खर्चाचा ताळमेळही जमेनासा झाला. प्रसंगी काही उत्पादकांनी हातउसनवार कर्ज काढून टमाटा शेती फुलविली. पुढील नियोजन आखण्यात आले; मात्र घसरलेल्या भावामुळे मागणी नाही, अशी स्थिती निर्माण झाली. दरम्यान बांगलादेश व दुबईत सध्या नाशिक जिल्ह्यातील टमाटा विक्र ीसाठी जात असल्याची माहिती टमाटा निर्यातदार संजय उंबरे यांनी दिली आहे.
शंभर ते दीडशे ट्रक टमाटा प्रतिदिन सध्या विक्र ीसाठी देशांतर्गत जात आहे. सध्या दहा ते बारा कंटेनर टमाटा दुबई व बांगलादेशात निर्यात होत असून, एका कंटेनरमध्ये वीस टन टमाटा वाहतूक क्षमता असते. निर्यातक्षम टमाटा २०० ते २५० रुपये तर स्थानिक घाऊक बाजारात प्रतवारी दर्जा मागणीनुसार १०० ते २०० रु पये वीस किलो जाळीचा भाव असल्याची माहिती उंबरे यांनी दिली. दरम्यान टमाटा भाववाढीचा वेग अपेक्षित नसला तरी सद्य:स्थितीतील भाववाढ उत्पादकांना थोड्या अंशी दिलासादायक ठरली आहे.
तर उत्पादकांना अच्छे दिन!
येत्या काळात भावात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान पाकिस्तानमध्ये भारतीय टमाट्याला निर्यातीच्या माध्यमातून प्रवेश मिळाला तर उत्पादकांना अच्छे दिन येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Improvement in Tomato Prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.