भाजीपाल्याच्या दरात सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:46+5:302021-04-13T04:13:46+5:30
नाशिक : महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त शहरातील विविध सामाजिक संघटनांतर्फे ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात ...
नाशिक : महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त शहरातील विविध सामाजिक संघटनांतर्फे ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संकटामुळे रस्त्यावर जयंती साजरी करता येणार नसली, तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम असून, ऑनलाइनच्या माध्यमातून जयंती साजरी केली जात आहे.
रुग्णांच्या नातेवाइकांचे भटकंती सुरूच
नाशिक : रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अनेक कोरोना रुग्णांचे नातेवाईक अद्याप शहरात भटकंती करत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने थेट रुग्णालयात इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे जाहीर केले असले, तरी ज्या रुग्णांना तातडीने गरज आहे, त्यांचे नातेवाईक मिळेल तेथे जाण्यासाठी तयार असून, इंजेक्शनबाबत विचारणा करत आहेत.
उत्पादन कमी झाल्याने डाळ महागली
नाशिक : यंदा उत्पादन कमी झाल्याने मसूर डाळीचे दर वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या डाळीच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांनी वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
बंदबाबत अधिकाऱ्यांमध्येच गोंधळ
नाशिक : बंदबाबत जिल्हा प्रशासन आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम असल्याने, त्याचा सर्वसामान्य विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर फळविक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्यांनाही पोलिसांकडून प्रतिबंध केला जात असल्याने, या विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
दंडात्मक कारवाईकडेही नागरिकांचे दुर्लक्ष
नाशिक : शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका आणि पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असली, तरी अद्यापही अनेक नागरिक विनामास्क गर्दीच्या ठिकाणी फिरताना दिसतात. यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा नागरिकांना कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
टरबुजाचे दर घसरले
नाशिक : कोरोनाचा प्रभाव वाढल्याने शहरात फळांना मागणी वाढली आहे. यामुळे विविध फळांंच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, टरबूज याला अपवाद ठरले असून, घाऊक बाजारात मागील सप्ताहात टरबुजाचे दर कमी झाल्याचे दिसून आले. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी
नाशिक : ऐन उन्हाळ्यात रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने, राज्य वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास डासांमुळे नागरिकांना झोप घेणे कठीण होते. वीज वितरण कंपणीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात
नाशिक : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून सुरू झालेला द्राक्ष हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. या वर्षी कोरोनामुळे काही व्यापारी खरेदीसाठी आलेच नाहीत, यामुळे द्राक्ष दरावर त्याचा परिणाम झाला. साधारत: एप्रिल अखेरपर्यंत हंगाम संपण्याची अंदाज व्यक्त केला जात आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच औषधोपचार
नाशिक : कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे थोडीही लक्षण दिसली, तरी नागरिक थेट डॉक्टरांकडे धाव घेत आहेत. यामुळे शहरातील विविध डॉक्टरांचे दवाखान्यांमध्ये गर्दी दिसून येत आहे. अनेक नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच औषधोपचार घेत आहेत.
अवैध बाजारात तळीरामांची लूट
नाशिक : राज्य शासनाने मागील सप्ताहापासून अधिकृत मद्यविक्रीची दुकाने बंद केल्याने अवैध मद्य विक्रीला उत आला असून, अव्वाच्या सव्वा दराने मद्यविक्री होत आहे. पोलिसांना अवैध मद्यविक्रीची ठिकाणे माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मोठा अनर्थ होण्यापूर्वीच या अवैध मद्यविक्रीला पायबंद घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.