कादवा निवडणुकीत ७० उमेदवारांचे अर्ज वैध, २९ अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 01:09 AM2022-03-09T01:09:56+5:302022-03-09T01:10:58+5:30
कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत एकूण ७० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर २९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आत्त. गेल्या पाच गळीत हंगामात किमान तीन वर्ष ऊस पुरवठा करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज वैध करण्यात आले,
दिंडोरी : जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत एकूण ७० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर २९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आत्त. गेल्या पाच गळीत हंगामात किमान तीन वर्ष ऊस पुरवठा करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज वैध करण्यात आले, तर तीन वर्षांपेक्षा कमी ऊस पुरवठा करणाऱ्या २७ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. एका उमेदवाराचे सहकारी सोसायटीची थकबाकी, तर एका उमेदवाराच्या अर्जावर सही नसल्याने अर्ज बाद करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी जी.जी. पुरी यांच्या मार्गदर्शनात छाननी प्रक्रिया पार पडली. मंगळवारी सकाळी ११ वाजता वैध अर्ज उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, १७ जागांसाठी ७० उमेदवारांचे अर्ज असून दोन पॅनेलमध्ये लढती रंगणार आहे. पॅनेल बनविताना माघारी घेण्याची मोठी कसरत पॅनेलप्रमुखांना करावी लागणार आहे. २२ मार्च दुपारी तीनपर्यंत माघारी घेता येणार आहे.