बजरंगवाडीच्या हरित मतदान केंद्राने वेधले लक्ष; मतदारांना केले आकर्षिक
By Suyog.joshi | Published: May 20, 2024 03:03 PM2024-05-20T15:03:16+5:302024-05-20T15:03:52+5:30
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिकरोडच्या हॅपी होम कॉलनी ,बजरंग वाडी येथे केवळ १७ टक्के मतदान झालेले होते
नाशिक - मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने एका केंद्रात हरित मतदान केंद्र स्थापन करण्यात आल्याने ते आकर्षण ठरले.
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिकरोडच्या हॅपी होम कॉलनी ,बजरंग वाडी येथे केवळ १७ टक्के मतदान झालेले होते. त्यामुळे त्याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासन आणि नाशिक महानगरपालिका यांनी या भागातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विशेष प्रयत्न केले. बजरंग वाडी भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेने येथे हरित मतदान केंद्र संकल्पना राबविली. त्याकडे मतदारांना आकर्षिक करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर धन्यवाद देण्यासाठी सुंदर झाडांची रोपे वाटली जात आहेत. त्याला तेथील नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथील मतदानाची टक्केवारी वाढतांना दिसून येत आहे,
दुपारी एक वाजेपर्यंत या भागात २५ ते ३० टक्के मतदान झाले आहे. आम्ही येथील नागरिकांचे खूप खूप आभार मानतो असे शहराच्या स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले.