नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात साधू-महंत आक्रमक -शिंदे सेनेकडून जोडे मारा आंदोलन
By संजय पाठक | Published: January 4, 2024 04:37 PM2024-01-04T16:37:43+5:302024-01-04T16:38:21+5:30
आव्हाड यांच्या विधानामुळे हिंदू धर्मातील शेकडो भाविकांच्या भावना दुखावल्या असून आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी साधू महंतांनी करत आज पोलिसांना निवेदन दिले.
नाशिक : माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांविषयी केलेल्या कथित अवमानकारक विधानामुळे नाशिकमध्ये साधू महंत आक्रमक झाले आहेत. आव्हाड यांच्या विधानामुळे हिंदू धर्मातील शेकडो भाविकांच्या भावना दुखावल्या असून आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी साधू महंतांनी करत आज पोलिसांना निवेदन दिले.
यावेळी महंत भक्तीचरण दास, महंत सुधीर पुजारी, स्वामी अनिकेत शास्त्री, हिंदू एकताचे रामसिंग बावरी, विश्व हिंदू परिषद, हिंदू एकता आंदोलन, दिगंबर आखाडा, श्री काळाराम मंदिरपुजारी, दिगंबर आखाडा, महर्षी पंचयतम सिद्धपीठ, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने मायको सर्कलजवळील चौकातआव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.