गोदाकाठी मध्यरात्री पोलीस अधीक्षक सचिन पाटील तळ ठोकून बसले, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 01:51 PM2022-07-12T13:51:48+5:302022-07-12T13:52:56+5:30
Superintendent of Police Sachin Patil sat on the ground : सायखेडा चांदोरी पुलावर असलेल्या पानवेली काढण्यात येत असून पूल वाहतुकी साठी बंद केलेला आहे.
ओझर : सायखेडा, चांदोरी येथे गोदावरी नदीच्या आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण चे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत तळ ठोकून होते. सायखेडा चांदोरी पुलावर असलेल्या पानवेली काढण्यात येत असून पूल वाहतुकी साठी बंद केलेला आहे.
जिल्हा वाहतूक,पोलीस मुख्यालय सह रॅपिड अकॅशन चे अधिकारी बोलवत वाहतूक वळवताना अतिउत्साही पर्यटकांना यावेळी आवर घातला. गोदाकाठी शिंगवे,करंजगाव, म्हाळसाकोरे, चाटोरी, चांदोरी यासह अनेक गावांना अती विसर्ग सुर असल्याने मोठा फटका बसला असून शेतीचे अतोनात नुकसान झाल्याचे प्रथदर्शनी दिसून येत आहे.पूर वळसा असलेल्या प्रत्येक गावात जाऊन पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेत काळजी घेण्याचे आवाहन केले.
जलसंपदाचे सागर शिंदे,ठाकरे,आदींसह सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी,मंडळ अधिकारी केवारे, ग्रामविकास अधिकारी कुंदे, चांदोरी चे ग्रामविकास अधिकारी सुरेश भांबारे यांच्यासह ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.