पूढील आठवड्यात दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’
By Sandeep.bhalerao | Published: August 29, 2023 06:44 PM2023-08-29T18:44:26+5:302023-08-29T18:45:16+5:30
शासनामार्फत ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दारी’ अभियान सुरू करण्यात आले आहे.
नाशिक : शासनामार्फत ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दारी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम येत्या ५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नोडल अधिकऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, अभियान नियोजनाच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी कार्यक्रम नियोजनाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनामार्फत सातत्याने योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असते. या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक येथे होणार असून, या कार्यक्रमासाठी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आणताना त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा.
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक व मालेगाव महानगरपालिका, जिल्हा परिषद, तसेच अन्य विभागांनी समन्वयाने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वी व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.