अरेरावीमुळे आॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थेने दर्शवली असमर्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 09:49 PM2020-05-24T21:49:01+5:302020-05-24T21:50:08+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेने तयार केलेल्या कोवीड रुग्णालयांना आॅक्सीजन सिलेंडर पुरविणाºया इंदूर गॅस एजन्सी यांना काही नागरिक कायमच जबरदस्ती व अरेरावी करतात त्यामुळे यापुढे सिलेंडर पुरविण्यास असमर्थता दर्शवली आहे.

The inability shown by the oxygen supply organization due to arrears | अरेरावीमुळे आॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थेने दर्शवली असमर्थता

अरेरावीमुळे आॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थेने दर्शवली असमर्थता

Next
ठळक मुद्देमालेगाव : नागरिकांनी गोंधळ घातल्याने मानसिक खच्चीकरण झाल्याची संचालकांची प्रतिक्रिया

मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेने तयार केलेल्या कोवीड रुग्णालयांना आॅक्सीजन सिलेंडर पुरविणाºया इंदूर गॅस एजन्सी यांना काही नागरिक कायमच जबरदस्ती व अरेरावी करतात त्यामुळे यापुढे सिलेंडर पुरविण्यास असमर्थता दर्शवली आहे.
मनपाच्या कोविड रुग्णालयांना आॅक्सिजन गॅसपुरवठा करणारÞी संचालक भरत मेहता यांची इंदूर गॅस एजन्सी ही एकमेव संस्था आहे. तिथे दिनांक २१ मे रोजी ४ वाजेच्या दरम्यान व २३ मे रोजी साडेतीन वाजेच्या दरम्यान काही नागरिकांनी येऊन गोंधळ घातला. त्यांना धमक्या दिल्या. त्यामुळे संचालक मेहता यांनी आपले मानसिक खच्चीकरण झाले असून यापुढे आॅक्सिजन गॅस पुरवठा करू शकत नाही. तसेच जीविताला धोका असल्याची माहिती मनपा उपायुक्त (विकास) नितीन कापडणीस यांना देवुन गॅस गोडाऊनच्या चाव्या उपायुक्तांकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला.
यावर उपायुक्त कापडणीस यांनी त्यांची तात्पुरती समजूत घातली आणि पोलिस उपअधीक्षक नवले यांना भ्रमणध्वनीवरून सदर आॅक्सिजन सिलेंडर पुरवठा करणाºया एजन्सीला पोलीस संरक्षण प्रदान करावे अशी सूचना केली.
सध्या आपल्या शहराला कोरोना पासून वाचविण्यासाठी कोविड रुग्णालयांना आॅक्सिजन गॅस सिलेंडरची नितांत आवश्यकता आहे, सध्या मेहता हे राष्ट्रीय कर्तव्य करत असून त्यांची सेवा शहरासाठी अत्यंत आवश्यक आहे.
महानगरपालिकेला यापुर्वीच मेहता यांच्या कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था करावी लागली आहे.
त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास मदत करणाºया लोकांना व संस्थांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: The inability shown by the oxygen supply organization due to arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.