आवक घटली : पितृपक्षात मागणी वाढली भाज्या महागल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:33 AM2017-09-10T00:33:09+5:302017-09-10T00:33:20+5:30
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे भाजीपाला व फळभाज्यांची नासाडी झाल्याने बाजारात आवक घटली आहे. त्यातच पितृपक्षात भाज्यांची मागणी वाढल्याने बाजारभाव भडकले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात चढ्या दराने भाजीपाला विक्री होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
पंचवटी : गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे भाजीपाला व फळभाज्यांची नासाडी झाल्याने बाजारात आवक घटली आहे. त्यातच पितृपक्षात भाज्यांची मागणी वाढल्याने बाजारभाव भडकले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात चढ्या दराने भाजीपाला विक्री होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
गणेशोत्सवात अधूनमधून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजार समितीत येणाºया भाजीपाला-फळभाज्यांच्या आवकेवरही त्याचा परिणाम झाला. गेल्या चार-पाच दिवसात पावसाने उघडीप दिली असली तरी अजूनही भाजीपाल्याची आवक वाढलेली नाही. त्यामुळे भाज्यांचे दर वधारले आहेत. त्यातच सध्या पितृपक्ष सुरु असल्याने भाज्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. प्रामुख्याने, पितृपक्षात पितरांना भोजन घालण्यासाठी दाखविल्या जाणाºया नैवेद्यात विविध प्रकारच्या भाज्या असतात. या भाज्यांची आवक कमी होत असल्याने त्यांचे दर वधारले आहेत. नाशिक बाजार समितीत कारली २०० रुपये जाळी, डांगर २५ रुपये, दोडके १५० रुपये जाळी, तर मेथीला दहा ते तीस रुपये प्रतिजुडी असा बाजारभाव मिळाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. किरकोळ बाजारातकारली ४० रुपये प्रतिकिलो, डांगर ४० रुपये, दोडके ६० रुपये, गवार ८० रुपये किलो तर भेंडी ४० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावी लागत आहे.