सटाणा पालिकेत अपु्ऱ्या मनुष्यबळाचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:16+5:302021-06-06T04:11:16+5:30

मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे, सन २००५ नुसार परिषदेचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. सदर आकृतिबंध मंजूर होऊन १३ ...

Inadequate manpower in Satana Municipality | सटाणा पालिकेत अपु्ऱ्या मनुष्यबळाचा तिढा

सटाणा पालिकेत अपु्ऱ्या मनुष्यबळाचा तिढा

googlenewsNext

मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे, सन २००५ नुसार परिषदेचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. सदर आकृतिबंध मंजूर होऊन १३ वर्षे पूर्ण झालेली आहेत. सदर कालावधीत आस्थापनेवरील अनेक पदे विविध कारणास्तव रिक्त होऊन पदभरती होऊ शकलेली नाही. परिणामी परिषदेकडे अपुरे मनुष्यबळ आहे.

नगर परिषद क्षेत्रातील वाढ, वाढती वसाहत, लोकसंख्येतील वाढ, जनतेच्या अपेक्षा, नागरी सोयीसुविधांवर पडणारा ताण तसेच विद्ममान आकृतिबंधातील अटीमुळे रिक्त होणारी पदे भरता येत नसल्याने सटाणा नगर परिषदेच्या आस्थापनेवरील वर्ग ३ ची ४१ व वर्ग ४ ची ६७ पदे अशी एकूण १०८ पदे व्यपगत झाली आहेत.

२०१८ मध्ये शासनास सदर भरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर शासनाने सुधारित आकृतिबंध मंजूर करून मग प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार पालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तालय नाशिक यांच्यामार्फत सदर प्रस्ताव संचालक नगर विकास प्रशासन मुंबई यांना सादर करण्यात आल्याचेही मोरे यांनी निदर्शनास आणून दिले.

कोट....

सद्य:स्थितीत कोरोनाकाळात परिषदेची कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडून कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याने तातडीने नवीन पद भरतीस मान्यता मिळावी.

- सुनील मोरे, नगराध्यक्ष

Web Title: Inadequate manpower in Satana Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.