अपुऱ्या पावसाने रब्बी पिकांना धोक्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:22+5:302021-09-14T04:17:22+5:30
एकलहरे भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात टमाटे लागवड करतात. काहींनी जूनमध्ये, तर काहींनी नागपंचमीच्या हंगामातील टमाटे लागवड केली. मात्र यंदा ...
एकलहरे भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात टमाटे लागवड करतात. काहींनी जूनमध्ये, तर काहींनी नागपंचमीच्या हंगामातील टमाटे लागवड केली. मात्र यंदा हवा तसा भाव न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये नेलेल्या टमाट्याचा वाहतूक खर्चही निघाला नाही. त्यामुळे अनेकांनी झाडे उपटून फेकून दिली. नागपंचमीच्या हंगामातील टमाटे सध्या दुसऱ्या खुड्यावर आहेत. मात्र लागवडीपासून पीक मार्केटला जाईपर्यंतचा जेवढा खर्च होतो त्याची फक्त तोंडमिळवणी होते, असे शेतकरी सांगतात. तालुक्याच्या पूर्व भागातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदगिरी, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबिनची लागवड केली आहे. सोयाबिन काढल्यानंतर जनावरांकरिता सकस चारा म्हणून भुशाचा वापर होतो. सोयाबिनचा पालापाचोळा शेतात पडत असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. जनावरांसाठी आणि कुक्कुटपालनासाठी सोयाबिन पेंडचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो, असे एकलहरेचे प्रगतशील शेतकरी रामदास डुकरे पाटील यांनी सांगितले.