‘शेल्टर’चे दिमाखदार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:51 AM2019-12-20T00:51:14+5:302019-12-20T00:51:36+5:30

गृहखरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना प्लॅट्स, प्लॉट््स, आॅफिसेस, फॉर्महाउस, शॉप यांसह बांधकाम साहित्य, गृहसजावट आणि अर्थसहाय्याचे अनेकविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणाºया शेल्टर प्रदर्शनाचे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे गुुरुवारी (दि.१९) दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले.

The inaugural 'Shelter' | ‘शेल्टर’चे दिमाखदार उद्घाटन

शेल्टर-२०१९’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना विभागीय आयुक्त राजाराम माने. समवेत रवी महाजन, कृणाल पाटील, सुनील कोतवाल, अनंत राजेगावकर, उमेश वानखेडे, विश्वास नांगरे-पाटील, राधाकृष्ण गमे, जितूभाई ठक्कर, निखिल रुंग्टा.

Next
ठळक मुद्देप्रॉपर्टी एक्स्पो : एकाच छताखाली गृहप्रकल्पांचे विविध पर्याय

नाशिक : गृहखरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना प्लॅट्स, प्लॉट््स, आॅफिसेस, फॉर्महाउस, शॉप यांसह बांधकाम साहित्य, गृहसजावट आणि अर्थसहाय्याचे अनेकविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणाºया शेल्टर प्रदर्शनाचे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे गुुरुवारी (दि.१९) दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले. नाशिक शहरात घर घेऊ इच्छिणाºया संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह व मुंबई, पुण्यातील ग्राहकांना त्यांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दि.१९ ते २२ डिसेंबर या कालावधीत ‘शेल्टर-२०१९’ एक पर्वणी ठरणार आहे.
डोंगरे वसतिगृह मैदानावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत सुमारे दहा एकरावरील विस्तिर्ण प्रदर्शनाचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्वलनाने क्रेडाईतर्फे आयोजित या ‘शेल्टर-२०१९’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे, उपाध्यक्ष तथा शेल्टरचे समन्वयक रवि महाजन, सहसमन्वयक कृणाल पाटील, क्रेडाईचे माजी, जितूभाई ठक्कर, अध्यक्ष अनंत राजेगावकर, महाराष्ट्रचे मानद सचिव सुनील कोतवाल, निखिल रुंग्टा आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजाराम माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नाशिक शहरातील स्वच्छ व हरित शहर अशी ओळख कायम ठेवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम प्रकल्प साकारण्याचा सल्ला दिला. नाशिक हे झपाट्याने विकसित होणारे शहर असून, येथील निवासासाठी पोषक वातावरणासह नियोजनपूर्वक झालेला औद्योगिक व रस्ते विकास शहराच्या भविष्यातील विकासाला चालना देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. नाशिक शहराच्यादृष्टीने भविष्यातील आव्हानांचा विचार करून बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या प्रकल्पांचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना शहर विकासासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही वेगवेगळ्या व्यावसायिक संघटनांनी सहभाग नोंदविण्याची गरज माने यांनी यावेळी व्यक्त केली. बांधकाम प्रकल्पांचे नियोजन व आखणी करतानाच त्यात सौरऊर्जाप्रकल्प, जलसंवर्धन व कचरा व्यवस्थापनाच्या उपाययोजना करून प्रकल्प उभारण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले, तर प्रास्ताविक करताना क्रे डाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी शहराच्या विकासात क्रेडाईचे योगदान नमूद केले. नाशिकमध्येच जन्मलेल्या क्रेडाईने नाशिक शहर आणि शेल्टरला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विशेष उंची मिळवून दिल्याचे अधोरेखित करतानाच ‘शेल्टर-२०१९’ प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यातून शहराचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही ब्रॅण्डिंग करण्याचा प्रयत्न असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. तर सूत्रसंचालन भूषण मटकरी यांनी केले.
एकाच छताखाली विविध स्टॉल
उत्तम हवामान, नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या अनेक संधी यामुळे नाशिकबाहेरील अनेक नागरिकांची नाशिकमध्ये घर घेण्याची तसेच गुंतवणूक करण्याची इच्छा असते, त्यांनाही वेगवेगळे पर्याय एकाच छताखाली शेल्टर प्रदर्शनातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात सुमारे शंभर विकासकांसह १५ वेगवेगळ्या अर्थसहायक करणाºया कंपन्या, ५५ बांधकाम साहित्य पुरवठादार कंपन्यांच्या व वितरकांच्या स्टॉलचा समावेश आहे. ‘वॉव नाशिक, नाऊ नाशिक’ या संकल्पनेवर आधारित शेल्टर-२०१९ या प्रदर्शनात ‘भविष्यातील नाशिक कसे असेल’ याकरिता एक वेगळी गॅलरी तयार करण्यात आली आहे.
पहिल्याच दिवशी शंभरहून अधिक फ्लॅट््सची विक्री
‘शेल्टर-२०१९’ प्रॉपर्टी एक्स्पोला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशीच शंभरहून अधिक फ्लॅट्सची विक्री झाली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत शेल्टरला चांगला प्रतिसाद मिळण्याचा विश्वास क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी (दि.२०) रोजी ‘धुराळा’ चित्रपटातील कलाकार अलका कुबल, सई ताह्मणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव व अंकुश चौधरी हे प्रदर्शनास भेट देऊन नाशिककरांशी ‘शेल्टर’च्या व्यासपीठावरून संवाद साधणार असल्याने नाशिककर मोठ्या प्रमाणात शेल्टरला भेट देतील, अशी बांधकाम व्यावसायिकांना अपेक्षा आहे.

Web Title: The inaugural 'Shelter'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.