एरंडगावलाा आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 04:08 PM2018-10-09T16:08:55+5:302018-10-09T16:09:17+5:30
जळगाव नेऊर : एरंडगाव येथे १.२० कोटी रु पये खर्चाचे प्राथमिक आरोग्य उप केंद्र व प्राथमिक शाळेत ई-लर्निंग उद्घाटन माजी उप मुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांच्य हस्ते झाले. भुुुजबळ पुढे म्हणाले की, एरंडगाव येथे सुसज्य असे आरोग्य केंद्र उभारले असून या आरोग्य केंद्रांमुळे गावातील व परिसरातील रु ग्णांवर गावातच मोफत उपचार होणार आहेत. शासकीय कामे ही कमी कालावधीत पूर्ण होत नसतात. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर मंजुऱ्या घ्यावा लागतात. सर्व सुविधांयुक्त सुसज्य असे रु ग्णालय उभारले आहे. पण त्याची काळजी घेणं हे आपलं काम आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणासाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ई- लर्निंगची सोय झाल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता येईल, . येवला तालुक्याची दुष्काळसदृष्य परिस्थिती पाहता ५० पैसेच्या आत आणेवारी आहे. मात्र शासनदरबारी येवला दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नाही. येवला तालुका दुष्काळग्रस्त यादीत घेतलाच पाहिजे. सर्वात जास्त टँकर येवल्यात चालू आहे, असेही भुजबळ म्हणाले. माणिकराव शिंदे, अनिस पटेल, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, बबन पोटे यांचीही यावेळी भाषणे झाली.
यावेळी ,वसंतराव पवार, नवनाथ काळे ,सरपंच रत्ना पिंगट, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकृष्ण सोनवणे, तहसीलदार रोहिदास वारु ळे, प्रभाकर रंधे, माजी सरपंच विठ्ठल जगताप, प्रकाश वाघ,, सचिन कळमकर, संतु पाटील झांबरे, मुख्याध्यापक नवनाथ कांगणे, प्रीतम शहारे, तलाठी निर्मळ, अनिल दारूनटे, शिवाजी खापरे, रावसाहेब आहेर, मुखेड वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बैरागी, आरोग्य सहाय्यक राजेंद्र खैरे, आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन राजेंद्र ठोंबरे यांनी केले.