नाशिकच्या सातपूर क्लब हाउसमध्ये बाम शूटिंग रेंजचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:08 PM2018-01-30T12:08:37+5:302018-01-30T12:15:27+5:30

Inauguration of Balm Shooting Range at Satpur Club House in Nashik | नाशिकच्या सातपूर क्लब हाउसमध्ये बाम शूटिंग रेंजचे उद्घाटन

नाशिकच्या सातपूर क्लब हाउसमध्ये बाम शूटिंग रेंजचे उद्घाटन

Next
ठळक मुद्देअत्याधुनिक सुविधानेमबाजांना सरावासाठी रेंज उपलब्ध

नाशिक : दिवंगत क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ कै. भीष्मराज बाम यांच्या नावाने साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक शूटिंग रेंजचे उद्घाटन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या हस्ते करण्यात आले. मन एकाग्र करण्यासाठी नेमबाजी महत्त्वाचे क्षेत्र असून, येत्या काळात या रेंजच्या माध्यमातून नेमबाज नाशिकच्या लौकिकात नक्कीच भर घालतील, असा विश्वास आयुक्तांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
सातपूर क्लब हाउस येथे एक्सेल टार्गेट शूटर्स असोसिएशनच्या माध्यमातून अत्याधुनिक शूटिंग रेंज साकारण्यात आली आहे. नाशिकमधील नेमबाजांना उत्तम दर्जाची रेंज सरावासाठी उपलब्ध व्हावी आणि त्यांची कामगिरी उंचवावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या दिवंगत क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांचे दृश्यरूप साकार झाल्याने शूटिंग रेंजला त्यांचे नाव देण्यात आले आहे. याप्रसंगी श्रद्धा नालमवार यांनी रेंजची वैशिष्ट्ये व माहिती सांगितली. या नव्या रेंजमुळे नेमबाजांच्या कामगिरीत सुधारणा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी बाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शर्वरी लथ यांनी प्रास्ताविक केले व बाम सरांची इच्छा आज पूर्ण होत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच त्यांच्या समोर ती पूर्ण न करता आल्याची खंतही व्यक्त केली. यावेळी शहर अभियंता उत्तम पवार, प्रदीप बत्रा, शशिकांत पारख, ओढेकर, पानसरे, सुभाष पाटील आदींचा सत्कार करण्यात आला.  एक्स एल क्लबची स्थापना बाम यांनी २००१ मध्ये केली होती. सातपूर क्लब येथे त्यावेळी अस्तित्वात असलेल्या रेंजवर क्लबचे नेमबाज सराव करीत असत. क्लबमध्ये एक राष्ट्रीय दर्जाची दोन मजली रेंज तयार करण्याचे बाम यांचे स्वप्न होते. २०१६ मध्ये विजयादशमीच्या दिवशी बाम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होऊन इथे असलेल्या जुन्या रेंजचे नूतनीकरण सुरू झाले. नाशिक मनपाच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास गेले आहे. एकावेळी २० नेमबाज सराव करू शकतील, अशी ही वातानुकूलित अद्ययावत रेंज आहे.

Web Title: Inauguration of Balm Shooting Range at Satpur Club House in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.