येवल्यात बँड संघटनेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:32 PM2020-01-14T17:32:59+5:302020-01-14T17:36:52+5:30
येवला : पारंपरिक कलेचा वारसा पुढे घेऊन चाललेला बँड व्यवसायाला सध्या खुप अडचणीला सामोरे जावा लागत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मंगळवारी येवला येथील माऊली मंगल कार्यालय येथे येवला तालुका बँड चालक मालक संघटनेचे उद्घाटन करण्यात आले.

बँड वाजवणे हा एक मंगलमय व आनंदाच प्रतिक मानल जात असताना आलीकडच्या काळात आम्हाला प्रशासन व गाड्या पासिंग न करणे तसेच इतर अनेक अडचणीला सामोरे जावा लागत आहे त्यावर काही तरी मार्ग काढावा अशी मागणी असणारे निवेदन येवला तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष नितीन जाधव यांनी या वेळी दिले. त्याबद्दल भुजबळ यांनी तालुक्यातील कोणत्याही बँड व्यवसायकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली.
या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष बंडू शिरसागर, राजू कांबळे. बँड संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष रज्जाक शेख मास्टर, शांताराम राऊत, प्रदीप पाटील, शाम संधानशीव, रोहित सरवार आदींसह अनेक मान्यवरांसह उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब दौड यानी केले.
(फोटो १४ येवला बॅन्ड)