अंधांच्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:39 AM2017-08-12T00:39:39+5:302017-08-12T00:39:53+5:30
येथील अग्रसेन भवनात अंध-अपंग प्रगती सोसायटीतर्फे आयोजित राज्यस्तरीय दृष्टिबाधितांच्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय वनअधिकारी जगदीश येडलावार यांच्या हस्ते करण्यात आले. यू. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते.
मालेगाव : येथील अग्रसेन भवनात अंध-अपंग प्रगती सोसायटीतर्फे आयोजित राज्यस्तरीय दृष्टिबाधितांच्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय वनअधिकारी जगदीश येडलावार यांच्या हस्ते करण्यात आले. यू. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुरुषोत्तम काबरा, महावीर छाजेड, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, वनपरीक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे, राष्ट्रीय दृष्टिबाधित बुद्धिबळ खेळाडू मदन बागायतदार व स्वप्नील शाह, महाराष्ट्र दृष्टिबाधित क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रमाकांत साटम, सीईओ सुरेश अय्यर, क्र ीडा प्रशिक्षक नितीन खैरनार, अंध-अपंग प्रगती सोसायटीचे अध्यक्ष के. जी. भिसे, विष्णू संगपाल, सीताराम बेडसे, ज्ञानेश्वर मर्डे उपस्थित होते. यू. आर. पाटील यांनी दृष्टिबाधितांनी दृष्टिबाधितांच्या प्रगतीसाठी चालवण्यात येणारी ही चळवळ सामाजिक चळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सोसायटीचे मार्गदर्शक डी. पी. जाधव यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र देवरे यांनी सूत्रसंचालन केले. तात्या पानपाटील यांनी आभार मानले. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे शंभर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. मालेगाव अंधशाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. या स्पर्धेसाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती सहसंयोजक आहेत. निखिल पवार, रविराज सोनार, राहुल देवरे, देवा पाटील, दादा बहिरम, देवेंद्र अलई, विवेक वारुळे, यशवंत खैरनार, हरीश मारू, आप्पा महाले आदी उपस्थित होते. तीनदिवसीय या स्पर्धेला मालेगावकारांनी प्रत्यक्ष भेट देऊन अंध स्पर्धकांचे कौतुक करावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे