चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 06:44 PM2021-02-27T18:44:10+5:302021-02-27T18:45:38+5:30

चांदोरी : के.के.वरिष्ठ महाविद्यालय चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केद्राचे उदघाटन प्राचार्य डॉ.आर.के.दातीर यांच्या हस्ते करण्यात आले.

Inauguration of Competitive Examination Guidance Center at Chandori | चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

googlenewsNext
ठळक मुद्देटिकायचे असेल तर स्पर्धेप्रमाणे स्वत:मध्ये बदल करणे गरजेचे

चांदोरी : के.के.वरिष्ठ महाविद्यालय चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केद्राचे उदघाटन प्राचार्य डॉ.आर. के. दातीर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सचोटी व चिकाटी असणे गरजेची आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे 19 व्या शतकामध्ये शैक्षणिक परिस्थिती कशी होती आणि नंतरच्या काळात ती परिस्थिती कशी बदलत गेली व सध्या 21 व्या शतकात शैक्षणिक परिस्थिती कशी बदललेली आहे याबद्दल मार्गदर्शन केले. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि ह्या परिस्थीतीत टिकायचे असेल तर स्पर्धेप्रमाणे स्वत:मध्ये बदल करणे गरजेचे आहे. महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेची तयार करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत स्टडी मटेरियल उपलब्ध करून देऊ असे आश्वासन प्राचार्य यांनी दिले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. सागर अस्वले यांनी स्पर्धा परिक्षेची तयार करत असतांना सयंम ठेवणे खुप महत्वाचे असते. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी कश्या पद्दतीने तयार केली पाहिजे याबद्दल सांगितले. यू.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. अंतर्गत कुठल्या पदासाठी परिक्षा घेतल्या जातात याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक प्रा. भगवान बैरागी यांनी स्पर्धा परीक्षेचे तयारी करताना जिद्द ठेवून त्याकडे आपण कशा पद्दतीने मार्गक्रमन केले पाहिजे तसेच मनुष्याचा जन्मामध्ये तारुण्य हा काळ सुवर्णकाळ म्हणून गौरवण्यात आलेला आहे आणि त्याचे योग्य ते नियोजन केल्यास स्पर्धा परिक्षेमध्ये यश प्राप्त करता येऊ शकते असे सांगितले. या पृथ्वीतलावर मानवी जन्म मिळणे ही एक भाग्याची गोष्ट मानली जाते व त्याचा योग्य वापर करणे ही एक मनुष्याची जबाबदारी आहे.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. तुषार बागुल यांनी केले.
 

Web Title: Inauguration of Competitive Examination Guidance Center at Chandori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.