विश्वास चषक क्रि केट स्पर्धेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 10:50 PM2019-05-11T22:50:38+5:302019-05-11T22:51:11+5:30
नाशिक : विश्वास को-आॅप बँक लि., नाशिक, नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅक्स असोसिएशन, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास, विश्वास गार्डन, सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीज यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास चषक क्रि केट स्पर्धा २०१९ या स्पर्धेचा शुभारंभ नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा यांच्या हस्ते करण्यात आले.

सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीजच्या मैदानावर या स्पर्धा शनिवार (दि.११)े रविवार (दि.१२) तसेच शनिवार (दि.१८) व रविवार (दि.१९) पर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत.
या क्रिकेट स्पर्धेत विश्वास बँक, नाशिक मर्चन्टस् बँक, इंडस्ट्रीयल अॅण्ड मर्कन्टाईल बँक, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक, कळवण मर्चन्टस् बँक, समर्थ सहकारी बँक व जनकल्याण सहकारी बँक यांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे स्वागत व प्रास्ताविक विश्वास बँकचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. त्यानंतर स्पर्धेसाठी आलेल्या अशोक सातभाई, जालिंदर ताडगे, मकरंद सुखात्मे, विक्र म उगले, माधवराव चव्हाण, देवचंद आहेर आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
सहकार क्षेत्र हे सर्वांना सोबत घेऊन समाजाचा विकास करणारे क्षेत्र आहे. यातून संघभावना आणि एकजुटीने कार्य करण्याचा विचार सामावलेला आहे. तीच जाणीव विकसीत करण्यासाठी विश्वास चषक क्रि केट स्पर्धा महत्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन अजय ब्रम्हेचा यांनी केले.
स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामलाल सानप व विश्वास बँकेचे राजेंद्र कलाल, रमेश बागुल तसेच नागरी सहकारी बँकांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो ११ विश्वास चषक)