कोविड लस उपकेंद्राचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:36+5:302021-04-11T04:14:36+5:30
जळगाव निंबायती : निमगाव आरोग्य केंद्र व जळगाव निंबायती ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील ग्रामस्थांच्या सुविधेसाठी येथील अहिल्यादेवी ...
जळगाव निंबायती : निमगाव आरोग्य केंद्र व जळगाव निंबायती ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील ग्रामस्थांच्या सुविधेसाठी येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील माध्यमिक विद्यालयात कोविड लस उपकेंद्राचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख व उपसरपंच महेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पाटील यांनी स्वतः लस घेऊन लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील अहिरे, डॉ. अमोल निकम, आर. एस. अहिरे, आरोग्य सेविका पल्लवी बच्छाव, सी. एस. अमराळे, संस्थेचे संचालक जगन्नाथ दुकळे, सरपंच संगिता कऱ्हे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पत्करून परिसरातील वयोवृद्धांना व रुग्णांना मालेगाव अथवा निमगाव येथील केंद्रांवर जाऊन कोविडची लस घ्यावी लागत होती. आता मात्र गावातच कोविड लस उपकेंद्र सुरु झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. परिसरातील ४५ वर्षांवरील सर्व ग्रामस्थांनी व रुग्णांनी कोविडची लस घ्यावी, असे आवाहन डॉ. निकम यांनी उपस्थितांना केले.