लेखा व कोषागार कर्मचाऱ्यांच्या विभागीय स्पर्धांंचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 03:48 PM2018-11-24T15:48:02+5:302018-11-24T15:52:55+5:30
लेखा व कोषागारे विभागात काम करताना शरीर व मन सदृढ असणे गरजेचे आहे. यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्वाचे असून खेळामुळे दैनंदिन कामातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत होते. यास्पर्धांच्या निमित्ताने अधिकारी आणि कर्मचारी एकत्र आल्याने कार्यसंस्कृतीला पोषक वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन तापी खोरे विकास महामंडळाचे वित्त संचालक बाळासाहेब घोरपडे यांनी केले.
नाशिक : लेखा व कोषागारे विभागात काम करताना शरीर व मन सदृढ असणे गरजेचे आहे. यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्वाचे असून खेळामुळे दैनंदिन कामातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत होते. यास्पर्धांच्या निमित्ताने अधिकारी आणि कर्मचारी एकत्र आल्याने कार्यसंस्कृतीला पोषक वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन तापी खोरे विकास महामंडळाचे वित्त संचालक बाळासाहेब घोरपडे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या क्रीडांगणावर लेखा व कोषागारे संचालनालयाच्या कर्मचारी कल्याण समितीच्या माध्यमातून नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन बाळासाहेब घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संचालक जितेंद्र इंगळे, वित्त व लेखा विभागाचे सहसंचालक राजेश लांडे, नाशिक विभागाचे सहसंचालक निलेश राजूरकर, गिरीश देशमुख, मनपाचे मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव, मुख्य लेखा अधिकारी सुहास शिंदे, आदिवासी विकास महामंडळाचे वित्त महाव्यवस्थापक उत्तम कावडे, जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक, वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी विकास गांगुर्डे आदी उपस्थित होते. दोन दिवस चालणाºया या स्पर्धांमध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडुंनी सहभाग घेतला आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धीबळ, व्हॉलीबॉल यासह विविध मैदानी क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागाचे सहसंचालक गिरीश देशमुख यांनी दिली.
नाशिकच्या धावपटुंचा झेंडा
लेखा व कोषागारे संचालनालयाच्या कर्मचारी कल्याण समितीच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी त्यांचा झेंडा रोवला. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात रंजन देशमुख व महिला गटात प्रमिला जाधव या नाशिकच्या स्पर्धकांनी विजय मिळविला. तर दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेतही नाशिकच्या दिपक बर्गे आणि बबिता गिरी यांनी विजेतेपद पटकावला.