ठाणगाव येथील भोर विद्यालयात डिजीटल क्लासचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 02:47 PM2019-08-14T14:47:30+5:302019-08-14T14:47:38+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये डिजीटल क्लासरूमचे उदघाटन करण्यात आले.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये डिजीटल क्लासरूमचे उदघाटन करण्यात आले. प्राचार्य व्ही.एस.कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मास शालेय समितीचे सदस्य नामदेव शिंदे, अरूण केदार, सतीश भोर, रामदास भोर, रोहीदास रेवगडे, रामदास भोर, भाऊसाहेब शिंदे, बी.बी.पगारे आदी उपस्थित होते. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयास प्रदान केलेल्या पस्तीस हजार रूपये किंमतीच्या डिजीटल इंटरअॅक्टिव्ह बोर्डचे अनावरण यावेळी मान्यवराच्या हास्ते करण्यात आले. बदलत्या काळानुसार विद्यालय डिजीटल होत आहे व विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देण्यात विद्यालय अग्रेसर असल्याचे नामदेव शिंदे यांनी सांगितले. प्राचार्य कवडे यांनी विद्यालयाच्या प्रगतीबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी एस.एस.शेणकर, आर. सी. काकड, आर. एल. मधे, एस. ओ. सोनवणे, वाय. एम. रूपवते, के. बी. भारमल, ए. बी. कचरे, डी. बी. दरेकर, ए. एन. जगताप, पी. ए. अकोलकर, आर. डी. सांगळे, एल. बी. वायळ, डी. व्ही. कहाणे, आर. जी. मेंगाळ, जी. एस. पावडे आदीेंसह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.