जिल्हास्तरीय ‘इन्स्पायर अवार्ड’ प्रदर्शनाचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 01:20 PM2020-01-17T13:20:36+5:302020-01-17T13:24:31+5:30
जिल्हास्तरीय ९ वे इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले
नाशिक : केंद्र शासन विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने संदीप फाउंडेशन, संदीप तंत्रनिकेतन येथे जिल्हास्तरीय ९ वे इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीपकुमार झा यांनी कार्यक्र मप्रसंगी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव, प्राचार्य प्रशांत पाटील, उपशिक्षणाधिकारी के. डी. मोरे, पार्थ पवार, प्रशांत खरंगते, गटविकास अधिकारी विनोद मेढे, उपशिक्षणाधिकारी बी. टी, चव्हाण, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. के.अहिरे, एस. के. सावंत, एस. बी. देशमुख, विज्ञान अध्यापक संघाचे डी. यू. अहिरे, दिनेश पवार, एन. एम. खैरनार, सुनील भामरे, किशोर जाधव, पुरु षोत्तम रकिबे, वाय. आर. पवार, छोटू शिरसाट, संजय देसले आदी उपस्थित होते. या योजनेमध्ये राज्य शासनाने व केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या शाळांमध्ये प्रत्येक शाळेतील दोन गटातील प्रत्येकी एक या प्रमाणे किमान २ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवॉर्डसाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्या कडून निवड करण्यात येते. सदर विद्यार्थ्यांना उपकरण तयार करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे मदत करण्यात येते. या कार्यक्र मात विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित खालील प्रकल्प सादर करण्यात आले.