शिरेवाडी टाकेदला मोफत शिवणकाम वर्गाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:05+5:302021-08-23T04:17:05+5:30
कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, संचालिका ज्योती लांडगे, एम.व्ही.पी.चे संचालक भाऊसाहेब खातळे, सरपंच ताराबाई रतन बांबळे, माजी जि. प. ...
कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, संचालिका ज्योती लांडगे, एम.व्ही.पी.चे संचालक भाऊसाहेब खातळे, सरपंच ताराबाई रतन बांबळे, माजी जि. प. सदस्य केरू दादा खतेले, चंद्रभान महाले, सरपंच काशिनाथ कोरडे, भाऊराव महाराज धादवड, रामचंद्र परदेशी, दत्तात्रय भोकनळ, आदी उपस्थित होते.
आदिवासी भागातील महिलांना स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे या उद्देशाने संस्थेने आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, बारशिंगवे, सोनोशी, शिरेवाडी, आदी गावपाड्यावरून सुमारे ५० महिलांना येथे मोफत शंभर दिवस प्रशिक्षण देणे सुरू झाले आहे. यासोबतच एम्ब्राॅयडरीचेही प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना मार्केट उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच रामचंद्र परदेशी, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, माजी सरपंच संतोष साबळे, दुंदा जोशी, दौलत बांबळे, रतन बांबळे, संजय डावरे, वाणी, लहामटे, बांबळे, यशवंत धादवड, आशा बोराडे, हिरा घाणे, हिरा धादवड, शुषमा घोडे आदी उपस्थित होते.
फोटो - २२माणिकराव कोकाटे
जन शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार माणिकराव कोकाटे. समवेत शशिकांत जाधव, भाऊसाहेब खातळे, भाऊराव महाराज धादवड, ज्योती लांडगे, आदी.
220821\22nsk_11_22082021_13.jpg
फोटो - २२माणिकराव कोकाटे जन शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार माणिकराव कोकाटे. समवेत शशिकांत जाधव, भाऊसाहेब खातळे , भाऊराव महाराज धादवड,ज्योती लांडगे आदी.