‘ज्ञानकुंभ २०१७’ परिषदेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:34 AM2017-11-12T00:34:15+5:302017-11-12T00:38:21+5:30
नवीन पिढी घडविण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी पुढील समाज शारीरिक व मानसिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी माता-पित्यांना मार्गदर्शन करावे, समाज घडविण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सेवेबरोबरच जनजागृतीचे कामही सुरू ठेवावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केली. ते ‘ज्ञानकुंभ २०१७’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
नाशिक : नवीन पिढी घडविण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी पुढील समाज शारीरिक व मानसिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी माता-पित्यांना मार्गदर्शन करावे, समाज घडविण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सेवेबरोबरच जनजागृतीचे कामही सुरू ठेवावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केली. ते ‘ज्ञानकुंभ २०१७’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शनिवारी (दि.११) हॉटेल एमराल्ड पार्क येथे स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेद्वारे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी झगडे म्हणाले की, स्त्री-पुरुष जन्मदराच्या विषमतेच्या परिस्थितीला आळा घालण्यासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी. सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना अनेदा ताणतणावाचा सामना करावा लागतो. तणावमुक्तीसाठी सदैव आनंदी राहून नियमित व्यायाम, धावणे, पुरेशी झोप आदींचा अवलंब करून जीवनशैलीत सुधारणा करण्याचा सल्लाही झगडे यांनी दिला.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. आनंद तांबट, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. रवींद्र शिवदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. विकास गोºहे म्हणाले की, उपचार पद्धतीत बदलाची माहिती तसेच तज्ज्ञाच्या अनुभवाचा लाभ व्हावा, याकरिता ही परिषद निश्चितच उपयोगी ठरणार असून, या आदान-प्रदानाने उपचार पद्धतीत सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रविवारी (दि.१२) परिषदेच्या दुसºया दिवशी नवोदित डॉक्टरांकडून तयार केलेल्या पेपर्स व पोस्टर्सचे सादरीकरण होईल. यानंतर ‘गर्भाशयाचे आजार व त्यावरील शस्त्रक्रि याविरहित उपचार (हिस्टेरक्टॉमी) व सध्याचे प्रवाह’ या विषयावर चर्चासत्र होईल. याव्यतिरिक्त ‘वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रि येनंतर होणाºया प्रसूती व त्याचे उपचार’, ‘गर्भावस्थेतील रक्तामधील आजार’ यावरही तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
या दोनदिवसीय परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चासत्रे होणार असून, यामध्ये पहिल्या दिवशी गर्भावस्थेदरम्यान असणाºया विविध रोग दमा, फिट येणे, डेंग्यू, मधुमेह यांवर प्रभावी उपचार तसेच प्रसूतीशास्त्रातील जंतूसंसर्ग (सेप्सिस), फाबरॉईड्स यावर तज्ज्ञांनी तसेच ‘डॉक्टरांसाठी तणावमुक्ती’ या विषयावर रामकृष्ण मिशनचे स्वामी सत्येशानंद यांनी मार्गदर्शन केले.