नाशिकमध्ये ग्रामीण पोलिसांसाठी मुख्यालय येथे आरोग्य केंद्राचे उद्‌घाटन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:34+5:302021-05-03T04:09:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ आडगाव येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सत्तर बेडचे कोविड ...

Inauguration of Health Center at Headquarters for Rural Police in Nashik. | नाशिकमध्ये ग्रामीण पोलिसांसाठी मुख्यालय येथे आरोग्य केंद्राचे उद्‌घाटन.

नाशिकमध्ये ग्रामीण पोलिसांसाठी मुख्यालय येथे आरोग्य केंद्राचे उद्‌घाटन.

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ आडगाव येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सत्तर बेडचे कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन आज विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते झाले.

आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करून त्याचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्याची संकल्पना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आखली होती. त्याला जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे केला. दिघावकर यांनी उद्‌घाटन केल्यानंतर त्या स्थळी पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

या कोविड सेंटरमध्ये एकूण 70 बेड असून, ते सर्व ऑक्सिजन बेड आहेत. यात तेरा जण रुग्णांची देखभाल करण्यासाठी तैनात राहणार असून, तीन डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे पीजेडपी पॅटर्न नाशिकला पहिल्यांदाच बघायला मिळाला असल्याचे प्रतिपादन डॉ. दिघावकर यांनी केले.

इन्फो

ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ कोविड सेंटर साकारताना जिल्हा परिषदेची मोठी मदत झाली. याठिकाणी ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मोफत उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे काही प्रमाणात प्राथमिक उपचारात मोठा हातभार रुग्णांना लागेल. सुविधा व उपचाराच्या बाबतीत विशेष लक्ष दिले जाणार आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील

यांनी सांगितले.

Web Title: Inauguration of Health Center at Headquarters for Rural Police in Nashik.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.