ऐतिहासिक माहिती पट व चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 05:50 PM2019-01-24T17:50:21+5:302019-01-24T17:50:35+5:30
सिन्नर : येथील मविप्र समाजाच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने ऐतिहासिक माहिती पट व चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतातल्या ऐतिहासिक ठिकाणांची जपवणूक होणे गरजेचे आह आणि या कामांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुण पिढीने आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपल्या सामाजिक परंपरा यांची जाणीव ठेवून कार्यरत असणे गरजेचे आहे. ऐतिहासिक ठिकाणांची जपणूक करत असताना त्या ठिकाणी होणारे विद्रुपीकरण हा चिंतेचा विषय आहे. त्यासंदर्भात काळजी घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. हे विद्रुपीकरण किंवा ऐतिहासिक ठिकाणांचे जे नुकसान होत आहे ते थांबविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक भावनेतून या विषयाकडे लक्ष दिले पाहिजे. किमान आपल्या परिसरातील ऐतिहासिक ठिकाणे बघितली पाहिजे. त्यानिमित्ताने पर्यटनही होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आपला वैभव संपन्न इतिहास आणि संस्कृती आपल्याला माहीत होते. असे प्राचार्य डॉ. शिंदे यांनी सांगितले. महाविद्यालयातील इतिहास व संरक्षण शास्त्र विभागाने ऐतिहासिक माहिती पट व चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते.