मेशीत संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:45+5:302021-05-03T04:09:45+5:30
या विलगीकरण कक्षात रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गावातील असंख्य दानशूर ...
या विलगीकरण कक्षात रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गावातील असंख्य दानशूर व्यक्तींनी यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. एका विलगीकरण कक्षात दहा बेडची सुविधा उपलब्ध असून पाणी, चहा नाश्ता ,फळे, खुर्ची आदींसह आवश्यक बाबी पुरविण्यात आल्या आहेत. महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारले आहेत. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी विलगीकरण कक्षाचा खूप उपयोग होणार असल्याने तालुका प्रशासनानेही ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे यावेळी कौतुक केले आहे. देवळा तालुक्यातील असेच इतर गावांनीही मेशी गावाचा आदर्श घेऊन असे विलगीकरण कक्षाची स्थापना करावी, असे आवाहन तहसीलदार शेजूळ यांनी यावेळी केले. या विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी मेशीच्या सरपंच सुनंदा अहिरे, उपसरपंच भिका बोरसे, माजी सरपंच केदा शिरसाठ, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष बापू जाधव, प्राचार्य डी.जे. रणधीर, ग्रामपंचायत सदस्य शाहू शिरसाठ, तुषार शिरसाठ, सतीश बोरसे आदी उपस्थित होते. कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मोजकेच मान्यवर यावेळी उपस्थित होते.
फोटो ओळ - ०२ मेशी १
मेशी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करताना वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्वाती मोरे, तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ आदी.
===Photopath===
020521\02nsk_13_02052021_13.jpg
===Caption===
मेशी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उदघाटन करताना वैद्यकिय अधिकारी डाॅ. स्वाती मोरे, तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ आदी.