पिंपळगाव महाविद्यालयात ज्ञान-विज्ञान वाचन चळवळीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 04:49 PM2018-12-27T16:49:55+5:302018-12-27T16:50:12+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ विभागाच्या ज्ञान-विज्ञान वाचन चळवळीचे उद्घाटन अमेय शौचे यांच्या हस्ते झाले.
पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ विभागाच्या ज्ञान-विज्ञान वाचन चळवळीचे उद्घाटन अमेय शौचे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या गाजलेल्या पानिपत कादंबरीची अनेक वैशिष्ट्ये सांगत ही कादंबरी आजच्या काळात समाज जीवनासाठी कशी उपयुक्त आहे हे त्यांनी विशद केले.
उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.डब्ल्यू. दाते, जोंधळे, सोरटे, डहाळे, गायकवाड, बिन्नोर, निकम, ज्ञानोबा ढगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नारायण शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी व्याख्यानमालेची गरज व उद्देश स्पष्ट केले.
आज पहिले पुष्प गुंफण्यासाठी आलेले वक्ते प्रा. अमेय शौचे यांनी पानिपतचे युद्ध हे मराठ्यांच्या इतिहासात मराठ्यांनी दाखविलेले शौर्य, धैर्य, पराक्र म याचे ज्वलंत उदाहरण आहे. पानिपतमधून आपण सर्वांनी स्वत:ला शिस्त लावण्याचा धडा घ्यायला हवा. यावेळी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली होती. जिज्ञासू विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून विषयाबाबत अधिक माहिती जाणून घेतली. कार्यक्र माच्या शेवटी आभार सीताराम निकम यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानोबा ढगे यांनी केले.