निफाडला न्यायाधिश निवासस्थानांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 06:27 PM2018-09-05T18:27:22+5:302018-09-05T18:28:30+5:30

दोन कोटी १६ लाख रुपये खर्चून बांधकाम

Inauguration of judicial residence of Niphad | निफाडला न्यायाधिश निवासस्थानांचे उद्घाटन

निफाडला न्यायाधिश निवासस्थानांचे उद्घाटन

Next
ठळक मुद्देवकील संघाच्या मागणीनुसार लवकरच एक अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशांची नियुक्ती होण्यासाठी प्रयत्न सुरू

लासलगाव : न्यायाधिशांची निवासस्थाने होण्याकरिता निफाड वकील संघाचे योगदान मोठे आहे. या निवासस्थानामुळे निफाड येथील न्यायदान करणाऱ्या न्यायाधीयांच्या निवासाची उत्तम व्यवस्था झाली असून वकील संघाच्या मागणीनुसार लवकरच एक अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशांची नियुक्ती होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन नाशिकचे जिल्हा प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी न्यायाधिशांच्या निवास्थानाचे उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
सुमारे दोन कोटी १६ लाख रूपये खर्चुन तयार झालेल्या निफाड येथील न्यायाधीश निवासस्थानांचा उद्घाटन सोहळा निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जी.वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा सत्र न्यायाधीश पी.डी.दिग्रसकर , नाशिक येथील प्रमुख न्यायदंडाधिकारी सुधीर बुक्के, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. बी. काळे, व्ही.एस. हिंगणे, एस.एस.जहागिरदार व एस.डब्ल्यू.ऊगले, वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. कोचर, निफाडचे प्रांत महेश पाटील, गटविकास अधिकारी संदिप कराड , निफाड वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.जी.एन शिंदे बांधकाम विभाग उपअभियंता महेश पाटील यांच्या प्रमुुुख उपस्थितीत पार पडला. यावेळी निफाड वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. आय.आर.रायते यांनी निफाड येथील न्यायाधीश निवासस्थाने व इमारती होण्याकरीता वकील संघाचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.वाघमारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. निफाडचे प्रांत महेश पाटील यांनी निफाड वकील संघाचे विविध उपक्र मांचे कौतुक करून खेळाचे साहित्य नविन ठिकाणी मंजूर करावे असे सुचित केले. अ‍ॅड. संजय दरेकर यांनी सूत्रसंचालन केले तर अ‍ॅड. अरविंद बडवर यांनी आभार मानले. याप्रसंगी निफाड वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.बी.के.जंगम, सचिव अ‍ॅड.संजय दरेकर, अ‍ॅड.ए.के.भोसले,अविनाश उगलमुगले व संदिप पवार यांच्यासह वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Inauguration of judicial residence of Niphad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.