सिन्नरला क्रांतिज्योती सभागृहाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:19 AM2021-02-17T04:19:06+5:302021-02-17T04:19:06+5:30
-------------------- नांदुरशिंगोटेत कांदा ४३०० रुपये क्विंटल नांदूरशिंगोटे : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात सोमवारी झालेल्या कांदा ...
--------------------
नांदुरशिंगोटेत कांदा ४३०० रुपये क्विंटल
नांदूरशिंगोटे : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात सोमवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला ४३०० रुपयांचा भाव मिळाला. लिलावासाठी एकूण ८,४०० गोण्या (४,७१० क्विंटल) आवक झाली होती. लाल कांद्यास जास्तीत जास्त ४,३०० रुपये, सरासरी ३,५०० रुपये, तर कमीत कमी ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
---------------
रक्तदान शिबिरात ५१ पिशव्यांचे संकलन
सिन्नर : येथील रोटरी क्लब गोंदेश्वर, रोटरी क्लब सिन्नर यांच्या वतीने तसेच कॉलेज रन, सिन्नर तालुका वैद्यकीय सेवाभावी संस्था, सिन्नर सायकलिस्ट ग्रुप यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात क्लबच्या सदस्यांसह नागरिकांनी रक्तदान केले. ५१ बॅग्जचे रक्त संकलन करण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
------------
ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी
सिन्नर : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. आजमितीस शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांसह पालकांनी केली आहे. आगामी काळात दहावी व बारावीची परीक्षा होणार असल्याने तसेच महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे क्रमप्राप्त झाल्याने गैरसोय टाळण्यासाठी ही मागणी करण्यात येत आहे.
------------------
पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथे जनसेवा मंडळाच्या वतीने पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये आतंकी हल्ल्यात सीआरएफचे ४० जवान शहीद झाले. या वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष रामदास भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश भोर, उपसरपंच शेखर कर्डिले, अर्जुन आव्हाड आदींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बाजीराव शिंदे, अनिल आव्हाड, अक्षय भारती, दर्शन भोर, कार्तिक काकड, राहिल मनियार, अविनाश आंबेकर, अंकुश केदार, अक्षय डावरे, सुनील रेवगडे, दत्ता आंबेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य
नांदूरशिंगोटे : येथील बसस्थानक व परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकाच्या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. बसस्थानकशेजारील मोकळ्या जागेत गाजर गवत तसेच काटेरी झुडपे वाढल्याने घाणीचे साम्राज्य वाढले आहेत.