मालेगावी लोककला महोत्सवाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 04:28 PM2020-03-04T16:28:15+5:302020-03-04T16:28:38+5:30
मालेगाव : येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय लोककला महोत्सवाचे उद्घाटन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त संपदा हिरे यांचे हस्ते झाले.

सर्व लोककला मराठी मातीचे अस्सल देणं असून त्यातून आपला इतिहास समजतो. चालीरिती समजतात, सणवारांची परंपरा समजते. त्यामुळे लोककलांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचेही संपदा हिरे यांनी यावेळी सांगितले.
प्रमुख पाहुणे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे होते. त्यांनी उपक्रमांचे कौतुक केले. लोककलावंत चंदन कांबळे यांनी विविध लोकगीते सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिनेश शिरूडे होते. त्यांनी आपल्या साऱ्या लोकसाहित्याचा आढावा घेतला.