‘नाशिक मित्र’ या पोर्टलचे आज उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:35 AM2021-02-05T05:35:14+5:302021-02-05T05:35:14+5:30
नाशिक : सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयांमध्ये माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी होणार असून, नागरिकांचा हा ...
नाशिक : सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयांमध्ये माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी होणार असून, नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी व विविध योजनांचे प्रशासकीय कामकाज डिजिटलाइझ करण्यासाठी मंगळवारी (दि.२५) प्रजासत्ताकदिनी जिल्हा प्रशासनातर्फे ‘नाशिक मित्र’ पोर्टलचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाने मागील वर्षी सर्वाधिक सेवा हक्क अधिनियमाच्या अधिसूचनेत आणून प्रत्यक्षात साडेदहा लाखांहून अधिक सेवा नागरिकांना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. यापैकी पाच सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्याचा उपक्रम सुरू करण्यात येत असून, या सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्याचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना प्रलंबित कामांचा पाठपुरावा करणे अथवा अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी नाशिक मित्र नावाने पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. मागील वर्ष कोरोना संकटाचा सामना करण्यात गेले असले तरी या महामारीवर बऱ्यापैकी आता विजय मिळविल्याचे नमूद करतानाच नवीन वर्षात अनेकविध सकारात्मक कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कोट-
नाशिक जिल्ह्याच्या १५१ वर्षापूर्तीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यात थोड्या निधीअभावी असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासोबतच नाशिकची शक्तिस्थळे जगासमोर आणण्यासाठी सर्वसमावेशक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच कायमस्वरूपी संपदा निर्माण करण्याचे नियोजन आहे.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी