अहिर शिंपी समाजाच्या राष्टÑीय अधिवेशनाचे उद्घाटन आज समारोप : विविध उपक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:47 AM2018-01-07T00:47:01+5:302018-01-07T00:48:06+5:30
सिडको : समाजातील युवा पिढी ही उद्याच्या भारताची आधारस्तंभ आहे.
सिडको : समाजातील युवा पिढी ही उद्याच्या भारताची आधारस्तंभ आहे. ही युवा पिढी ऊर्जा व संकल्पाने भरलेली आहे. युवकांच्या कौशल्यास महत्त्व देण्यासाठीच या युवक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन मध्यवर्ती संस्थेचे नूतन कार्याध्यक्ष संजय खैरनार यांनी केले. अध्यक्षस्थानी समाजाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. दादासाहेब सुरते होते.
अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात आयोजित अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या राष्टÑीय अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी खैरनार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राहुल साळवे, विनय बिरारी, विजय बिरारी, योगेश निकुंभ, सिडको विभागाचे अध्यक्ष शेखर निकुंभ, नाना निकुंभ, मनोज भांडारकर, बी. एम. बागुल, अनंत पुणेकर, नरेंद्र कापडणीस, दीपक सावळे, समाजाध्यक्ष विजयनाना बिरारी, नूतन समाजाध्यक्ष सुनील बापू निकुंभ, उपस्वागताध्यक्ष डॉ. किशोर देवळालकर, विश्वस्त एन. एन. बागुल, डी. व्ही. बिरारी, शांताराम सावळे, रवींद्र बागुल, किशोर शिंपी, रामेश्वर धाडणकर, योगेश शिंपी, पी. जी. नेरे, अमर सोनवणे, सुनील गवादे, नाना निकुंभ, नंदू गवांदे, संजय सोनवणे आदी उपस्थित होते. खैरनार यांनी सांगितले की, समाजातील युवकांना नोकºया उपलब्ध नसल्याने त्यांनी व्यवसायात पदार्पण केलेच पाहिजे. मेहनत व जिद्दीने व्यवसाय केल्यास यश हमखास मिळतेच. स्वागताध्यक्ष मुकुंद मांडगे यांनी सांगितले की, समाजातील युवकांनी समाजाचा असलेला शिवणकाम हा व्यवसाय स्वीकारला पाहिजे. या व्यवसायाला औद्योगिक स्वरूप प्राप्त करून देण्याची जबाबदारी ही युवकांची आहे. तसेच समाज बांधवांची आर्थिक परिस्थिती सुधारित व्हावी याच उद्देशाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही मांडगे यांनी सांगितले. अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आपल्या मनोगतात समाजाचा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे समाजाचे संघटन मजबूत होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास सुनील निकुंभ, मधुकर कापडणे, प्रसाद खैरनार, राजेंद्र जाधव, विजय चव्हाण, सोपान शिरसाठ, अरुण खैरनार, हेमंत सोनवणी, महेश बिरारी, प्रवीण देवरे, नीलेश सोनवणे, डी. डी. डोंगरे, श्याम खैरनार, संदीप खैरनार, सुनील के. जगताप, बी. एम. बागुल, दीपक कापडणीस, दिलीप बाविस्कर, महेंद्र बाविस्कर, सुनील चव्हाण, बाळासाहेब खैरनार, एल. डी. मांडगे, उदय सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.