साहसी पर्यटन धोरण कार्यशाळेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 01:45 AM2022-05-27T01:45:31+5:302022-05-27T01:45:54+5:30
पर्यटन संचालनालयातर्फे आयोजित दोन दिवसीय साहसी पर्यटन धोरण कार्यशाळेचे गुरुवारी (२६ मे) ग्रेप पार्क रिसॉर्ट नाशिक येथे उद्घाटन झाले. याप्रसंगी साहसी पर्यटन, कॅरावॅन, टुरिझम व इंडस्ट्रियल स्टेटस पॉलिसी विषयावर चर्चा झाली.
नाशिक : पर्यटन संचालनालयातर्फे आयोजित दोन दिवसीय साहसी पर्यटन धोरण कार्यशाळेचे गुरुवारी (२६ मे) ग्रेप पार्क रिसॉर्ट नाशिक येथे उद्घाटन झाले. याप्रसंगी साहसी पर्यटन, कॅरावॅन, टुरिझम व इंडस्ट्रियल स्टेटस पॉलिसी विषयावर चर्चा झाली.
पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक धनंजय सावळकर, उपसचिव उज्ज्वला दांडेकर, अवर सचिव रमेश कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड, औरंगाबादचे श्रीमंत हारकर, अमरावतीचे विवेक घोडके, नागपूरचे प्रशांत सवई, पुण्याच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर उपस्थित होत्या.
याप्रसंगी महाराष्ट्र ॲडव्हेंचर काऊन्सिल दिलीप लागू व राजेश गाडगीळ यांनी ‘ॲक्टिव्हिटीज ऑन लॅण्ड इन ॲडव्हेंचर टुरिझम पॉलिसी’ विषयावर तर वरुण साहनी यांनी ‘इंडस्ट्रियल स्टेटस फॉर ग्रीन हाॅटेल्स’ विषयावर मार्गदर्शन केले. संजय उगलमुगले व जयप्रकाश दुबळे यांनी ‘वॉटर ॲक्टिव्हिटीज इन ॲडव्हेंचर टुरिझम पॉलिसीवर तर अवी मलिक यांनी ‘एअर ॲक्टिव्हिटीज इन ॲडव्हेंचर टुरिझम, शुभा भास्कर यांनी इंडस्ट्रियल पॉलिसी, सचिन पांचाळ यांनी कॅराव्हॅन टुरिझम, तर नरसिंह कृपादास यांनी गोवर्धन इको व्हिलेज, पालघर विषयावर आपले विचार मांडले.