शेतकऱ्यांना एकत्रपणे बांधावर खते वाटपाचा मालेगावी शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 12:15 AM2022-05-24T00:15:55+5:302022-05-24T00:16:47+5:30

मालेगाव : एकाच वेळी बांधावर खते, बियाणे कीटकनाशके उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील शेतकरी बचतगट, विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये खतांची मागणी करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

Inauguration of distribution of fertilizers to farmers in Malegaon | शेतकऱ्यांना एकत्रपणे बांधावर खते वाटपाचा मालेगावी शुभारंभ

मालेगाव येथे शेतकरी बांधवांना एकत्रपणे बांधावर खते वाटपाचा शुभारंभ करताना कृषिमंत्री दादा भुसे.

googlenewsNext
ठळक मुद्देनोंदणीचे आवाहन : कृषिमंत्री दादा भुसे यांची उपस्थिती

मालेगाव : एकाच वेळी बांधावर खते, बियाणे कीटकनाशके उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील शेतकरी बचतगट, विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये खतांची मागणी करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

सोमवारी (दि.२३) कृषी विभागाच्या व आरसीएफ कंपनीच्या वतीने राज्यात शेतकरी बांधवांना एकत्रपणे बांधावर खते वाटपाचा शुभारंभ भुसे यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. यावेळी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, भास्कर जाधव, मंडळ कृषी अधिकारी भाऊसाहेब आढाव, संदीप गलांडे, राहुल जाधव, दीपक मालपुरे, भगवान मालपुरे आरसीएफ कंपनीचे विपणन अधिकारी बजरंग कापसे, विशाल सोनवलकर, विनोद जाधव, मनोहर बच्छाव आदी उपस्थित होते. यावेळी भुसे म्हणाले की, सध्या शेतीविषयक परिस्थिती कठीण असली तरी शेतकरी बांधव अतिशय परिश्रमपूर्वक काम करीत आहे. हे काम करतांना शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके व निविष्ठांची आवश्यकता असते. शेतकरी बांधवांनी जर एकत्रितपणे खते, बियाणे व कीटकनाशके यांची खरेदी केली तर त्यांना शेताच्या बांधावर एकाचवेळी ते उपलब्ध होणार आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी बचतगट व विविध कार्यकारी सहकारी संस्थाकडे आपल्या मागणीची नोंदणी करावी. असे केल्यास कृषि विभागांतर्गत खतांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून पुरेशा प्रमाणावर साठा उपलब्ध करून देता येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

 

Web Title: Inauguration of distribution of fertilizers to farmers in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.