रेल्वे हेल्पलाइन फलकाचे उद्घाटन

By admin | Published: November 3, 2015 10:53 PM2015-11-03T22:53:47+5:302015-11-03T22:55:11+5:30

रेल्वे हेल्पलाइन फलकाचे उद्घाटन

Inauguration of the Railway Helpline | रेल्वे हेल्पलाइन फलकाचे उद्घाटन

रेल्वे हेल्पलाइन फलकाचे उद्घाटन

Next

नाशिकरोड : रेल्वे प्रवाशांना कुठलीही अडचण किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मदतीसाठी असलेल्या ‘रेल्वे प्रवासी हेल्पलाइन क्रमांक १८२’ च्या फलकाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान कुठलाही त्रास, टवाळखोरांकडून छेडछाड, लूटमार, चोरी आदि कुठलाही उपद्रव झाल्यास प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून ‘रेल्वे प्रवासी हेल्पलाइन क्रमांक १८२’ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती होण्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मंगळवारी सकाळी स्टेशन प्रबंधक एम. बी. सक्सेना, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक बी. डी. इप्पर यांच्या हस्ते हेल्पलाइन क्रमांक फलकाचे उद्घाटन झाले. तसेच रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षांवरदेखील जनजागृतीसाठी डिजीटल फलक चिटकविण्यात आले. यावेळी रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार, उपनिरीक्षक ललितसिंग, संजय गांगुर्डे, किशोर खडताळे, राजेंद्र चंद्रमोरे, बंडू बुवा, पप्पू शेख, रवि गजरमल, मुन्ना साळी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाशिकरोड रेल्वेस्थानकावर ‘रेल्वे प्रवासी हेल्पलाइन क्रमांक १८२’ फलकाचे अनावरण करताना स्टेशन प्रबंधक एम. बी. सक्सेना, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक बी. डी. इप्पर. समवेत नितीन पवार, ललितसिंग, संजय गांगुर्डे, किशोर खडताळे, रामा साळवे, महम्मद शेख, रवि गजरमल, अकिल शेख, पप्पू शेख, अल्ताफ सय्यद, बंडू बुवा आदि.

Web Title: Inauguration of the Railway Helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.