रासेयो श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:14 PM2020-01-02T23:14:28+5:302020-01-02T23:16:10+5:30
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कर शिबीराचे उद्घाटन वजीरखेडे येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिटी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद हाळे होते.
मालेगाव : शहरातील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कर शिबीराचे उद्घाटन वजीरखेडे येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिटी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद हाळे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विनोद बोरसे, उपसरपंच राजेंद्र शेवाळे, तलाठी श्रीमती मोर, पोलिस पाटील अशोक बोरसे, उपप्रचार्य डॉ. शकेब अहमद व डॉ. अरिफ अंजुम उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच विनोद बोरसे यांनी उदघाटन केले. उपसरपंच राजेंद्र शेवाळे यांनी शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. तलाठी श्रीमती मोरे यांनी रासेयो स्वयंसेवकांना स्पर्धा परीक्षांच्या अध्ययनाबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. अरिफ अंजुम यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची कर्तव्ये कथन केली. डॉ शाकेब अहमद यांचे भाषण झाले. प्राचार्य शिवानंद हाळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्र म अधिकारी प्रा. इमरान अहमद यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रिजवाना हमदानी यांनी केले. प्रा. हिरालाल नरवडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. भास्कर खैरनार यांनी आभार मानले.