खर्डेत आरओ प्लॅन्टचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:19 AM2021-08-17T04:19:49+5:302021-08-17T04:19:49+5:30
खर्डे ग्रामपंचायतीच्यावतीने गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी एटीएम आरओ फिल्टर प्लॅन्टची उभारणी केली आहे. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना ...
खर्डे ग्रामपंचायतीच्यावतीने गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी एटीएम आरओ फिल्टर प्लॅन्टची उभारणी केली आहे. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना २०० रुपये किमतीचे कार्ड दिले जाणार असून, याद्वारे ५ रुपयात १८ लिटर शुद्ध साधे पाणी, तर ८ रुपयात १८ लिटर थंड पाणी घेता येणार आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, तालुक्यातील बहुतांश गावांत अशाप्रकारे आरओ प्लॅन्ट कार्यरत असून, याच धर्तीवर खर्डे ग्रामपंचायतीने नवीन आरओ प्लॅन्टची उभारणी केली आहे. त्याचे रविवारी स्वातंत्र्यदिनी उद्घाटन करण्यात आले. या सुविधेने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी माजी सभापती बापू देवरे, माजी उपसरपंच राहुल देवरे, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, भाऊसाहेब मोरे, नानाजी मोरे, कारभारी जाधव, काकाजी देवरे, संदीप पवार, माधव ठोंबरे, रामकृष्ण कुवर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका सपकाळे, तलाठी उमेश गोपनारायण, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदींसह ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - १६ खर्डे आरटीओ
खर्डे येथे आरओ प्लॅन्टच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित प्रशासक प्रशांत पवार, बापू देवरे, कृष्णा जाधव, भाऊसाहेब मोरे, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदी.
160821\16nsk_17_16082021_13.jpg
फोटो - १६ खर्डे आरटीओ खर्डे येथे आरओ प्लँटच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रशासक प्रशांत पवार, बापू देवरे, कृष्णा जाधव , भाऊसाहेब मोरे ,ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदी