रोटरी क्लब ग्रेपसिटीचे पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:59 IST2020-08-18T22:04:41+5:302020-08-19T00:59:09+5:30

नाशिक : येथील रोटरी क्लब आॅफ नाशिक ग्रेपसिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आॅनलाइन पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मावळते अध्यक्ष राजन पिल्ले यांच्याकडून कविता दगावकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

Inauguration of Rotary Club Grapecity | रोटरी क्लब ग्रेपसिटीचे पदग्रहण

रोटरी क्लब आॅफ नाशिक ग्रेपसिटीच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी नरेश शहा, सुंदर राजन, मुरली राघवन, रमेश मेहेर, आशा वेणुगोपाल.

ठळक मुद्देउत्कृष्ट उपक्रम राबविणारे जयंत खैरनार यांना उत्कृष्ट रोटेरीयन म्हणून गौरविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील रोटरी क्लब आॅफ नाशिक ग्रेपसिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आॅनलाइन पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मावळते अध्यक्ष राजन पिल्ले यांच्याकडून कविता दगावकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून शब्बीर शाकीर, मेहेर, राजीव शर्मा, राजेंद्र धारणकर उपस्थित होते. गेल्या वर्षभरात उत्कृष्ट उपक्रम राबविणारे जयंत खैरनार यांना उत्कृष्ट रोटेरीयन म्हणून गौरविण्यात आले.
आशा वेणुगोपाळ यांनी यासंदर्भात घोषणा केली. अंजली मेहता यांनी सूत्रसंचालन केले. अमोल काबरा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केली. यावेळी नूतन पदाधिकऱ्यांची घोषणा करण्यात आली. यात आयपीपी राजन, उपाध्यक्ष अनिल देशमुख, सचिव विभा घावरे, कोषाध्यक्ष अंजली मेहता, डायरेक्टर इंटरनॅशनल नरेश शहा, संचालक फाउण्डेशन आशा वेणुगोपाल, सदस्य संचालक पद्मिनी सुजानाथन, नॉन मेडिकल संचालक असिफ शेख, न्यू जनरेशन प्रोजेक्ट दुर्गा साळी, मेडिकल डायरेक्टर रेणू पाणीकर, जनसंपर्क सुरूची रणदिवे, सार्जेंट आॅफ आर्म्स एस. चोखानी व अलका सिंह यांचा समावेश आहे.

Web Title: Inauguration of Rotary Club Grapecity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.