रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटीचे पदग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:25+5:302021-06-29T04:11:25+5:30
रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीच्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून निमाचे माजी अध्यक्ष ...
रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीच्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून निमाचे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रोटरी क्लबसारख्या संस्थांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला चालना देणे गरजेचे आहे. लोकांना मदत किती करावी याला मर्यादा आहे. मात्र जर त्यांनाच रोजगार उपलब्ध करून दिला, तर ते मोठे सामाजिक कार्य ठरेल. पाश्चात्त्य देशांत घराघरांत स्टार्टअप सुरू करून उद्योजकता जपली जाते. भारतातही तसे प्रयोग व्हायला हवेत. यावेळी व्यासपीठावर अनिल सुकेनकर, नवनिर्वाचित अध्यक्षा स्वाती चव्हाण, मावळत्या अध्यक्षा अपर्णा मारावार, सचिव मिलिंद पगार, ब्रिजमोहन लोंगानी, आदी उपस्थित होते.
यावेळी नूतन अध्यक्ष स्वाती चव्हाण यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत भुतडा, तन्वी शेटे यांनी केले. कैलास आहेर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विशाल गुंजाळ यांनी स्वागत केले. प्रास्तविक माजी अध्यक्ष तुषार चव्हाण यांनी केले. मुग्धान नागपूरकर यांनी आभार मानले. मावळत्या अध्यक्षा अपर्णा मारावार यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा स्वाती चव्हाण यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली. यावेळी माजी प्रांतपाल दादा देशमुख, राजेंद्र धारणकर, डॉ. राहुल ठाकरे, उल्हास बोरसे, डॉ. गायत्री गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, नलिनी गुंजाळ, आदींसह क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
फोटो :- रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्वाती चव्हाण समवेत गणेश कोठावदे, शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, डॉ. प्रशांत भुतडा, तन्वी शेटे, कैलास आहेर, डॉ. विशाल गुंजाळ, मुग्धान नागपूरकर, अपर्णा मारावार, आदींसह पदाधिकारी.
===Photopath===
280621\28nsk_17_28062021_13.jpg
===Caption===
रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्वाती चव्हाण समवेत गणेश कोठावदे,शशिकांत जाधव,तुषार चव्हाण,डॉ.प्रशांत भुतडा,तन्वी शेटे,कैलास आहेर,डॉ.विशाल गुंजाळ,मुग्धान नागपूरकर,अपर्णा मारावार आदींसह पदाधिकारी.