सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या हॉलचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:41 PM2019-04-10T21:41:40+5:302019-04-10T21:46:47+5:30
सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती निवासी केंद्राच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या हॉलचे उद्घाटन शाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या हस्ते झाले.
सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती निवासी केंद्राच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या हॉलचे उद्घाटन शाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या हस्ते झाले.
माळेगावचे उद्योजक त्रिलोकनाथ अग्रवाल, डॉ. किरण बडगुजर, शिवनाथ कापडी आदींसह मान्यवर उपस्थित होते. मेंढी येथे नाशिकच्या डॉ. आनंद पाटील फाउण्डेशनच्या वतीने चार वर्षांपासून सहारा निवासी व्यसनमुक्ती केंद्र सुरू आहे. आतापर्यंत दीड हजार रुग्णांनी समुपदेशन, औषधोपचार, वैचारिक प्रबोधन या माध्यमातून व्यसनमुक्त होऊन त्यांनी सुखी संसाराची वाट धरली आहे. एक ते तीन महिने या केंद्रात वास्तव्य केले जाते. या केंद्रास कुठलेही शासकीय अनुदान मिळत नसून केवळ रुग्णांकडून मिळणारी अल्प फी व दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या देणगीतून या केंद्राचा खर्च भागविला जात आहे. संस्था व देणगीतून जमा झालेल्या रकमेतून ८० बाय ४० च्या प्रशस्त हॉलचे बांधकाम पाच लाख रु पये खर्च करून करण्यात आले आहे.
यावेळी महेश मोरे, सपना बडगुजर, उत्तम गाढे, सुभाष गिते, भाऊसाहेब रणदिवे, सचिन ओझा, अॅड. भाग्यश्री ओझा, प्रेरणा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर बेलोटे, फिलोमिना डिक्रूज, पी.टी. डिसूझा, जैनेट रिबोला, रूंजाजी गिते, दीपक गिते, शीला गिते, सुरेश देव्हारे, प्रवीण शिंदे, योगेश धात्रक, नितीन साळुंखे, वनिता गिते, गौरव तनपुरे, बाळकृष्ण तनपुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यानिमित्ताने तनपुरे महाराजांचा गावांमध्ये पोवाड्याचा कार्यक्र म पार पडला.रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भावी काळात हॉलचा उपयोग होणार असल्याची माहिती केंद्राध्यक्ष मधुकर गिते यांनी दिली. यावेळी डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून फीत कापून व श्रीफळ वाढवून हॉलचे उद्घाटन करण्यात आले.