वणीमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:40 PM2019-12-13T18:40:17+5:302019-12-13T18:40:41+5:30
वणी येथील मविप्र समाज संचलित केआरटी हायस्कूल येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी अध्यक्ष विलास कड, तर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे संचालक दत्तात्रय पाटील उपस्थित होते. भविष्यकाळात नवनवीन तंत्रज्ञान येत राहील त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
वणी : येथील मविप्र समाज संचलित केआरटी हायस्कूल येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी अध्यक्ष विलास कड, तर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे संचालक दत्तात्रय पाटील उपस्थित होते. भविष्यकाळात नवनवीन तंत्रज्ञान येत राहील त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यावर भर द्यावा, असे
आवाहन त्यांनी केले. प्रवीण दोशी व रविकुमार सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक डी. बी.
चंदन यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक व्ही. पी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात (इयत्ता पाचवी ते सातवी ) ४३, तर माध्यमिक गटात (इयत्ता आठवी ते दहावी) ४२ उपकरणे ठेवण्यात आली होती.
यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य आबासाहेब देशमुख, गणपत पवार, किसनराव मोरे, पारस सिसोदिया, निवृत्ती देवरे, राजेंद्र देशमुख, शिवाजी शेटे, उपमुख्याध्यापक बी. पी. ढोकरे, पर्यवेक्षक एस.व्ही. खुर्दळ, पर्यवेक्षक ए.बी. ठुबे यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ए. आर. साठे, आर. ए. भरसट, के. एस. गोसावी, पी.बी. जावळे, जे. व्ही. खापरे, एस.डी. मोरे, जे. डी. इंगळे, आर. बी. कोल्हे, बी.जे. बागले, ए. आर. साबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एल. कड यांनी केले. आभार जी. बी. उगले यांनी मानले.