केबीएच विद्यालयात विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:17 AM2021-03-01T04:17:41+5:302021-03-01T04:17:41+5:30
विद्यार्थ्यांनी जिज्ञासूवृत्ती वाढवावी आणि विज्ञानातील संशोधक निर्माण व्हावेत, यासाठी विज्ञानाच्या विविध स्पर्धेत सहभाग घेत जिज्ञासूवृत्तीचे दर्शन घडवावे. तसेच ...
विद्यार्थ्यांनी जिज्ञासूवृत्ती वाढवावी आणि विज्ञानातील संशोधक निर्माण व्हावेत, यासाठी विज्ञानाच्या विविध स्पर्धेत सहभाग घेत जिज्ञासूवृत्तीचे दर्शन घडवावे. तसेच विविध विज्ञान प्रकल्प, भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधांचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करावेत, असे आवाहन डाॅ. शेवाळे यांनी केले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य विलास पगार, रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक प्रवीण पाटील, निवृत्ती निकम, संजीव महाले, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक मिलिंद वाघ, विज्ञान विषय प्रमुख डी. के. सोनजे, बी. पी. सोनवणे, के. वाय. देवरे, एस. के. सूर्यवंशी, एच. एन. सोनवणे, ए. एम. भालेराव, आर. एम. खैरनार, टी. डी. बोरसे, कामिनी शेलार उपस्थित होते.
माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बालवैज्ञानिक आदित्य जायखेडकर या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी बी. पी. सोनवणे यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व विशद केले. प्राचार्य पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्याख्याते, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक तसेच सर्व विज्ञान शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक राजेश धनवट यांनी केले. राजेंद्र शेवाळे यांनी आभार मानले.