वनारवाडी गावात अभ्यासिकेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:19 AM2021-09-08T04:19:29+5:302021-09-08T04:19:29+5:30
प्रारंभी वनारवाडी फाटा येथे अभ्यासिकेच्या दिशादर्शक फलकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक शाळेत ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. वनारवाडीतील ...
प्रारंभी वनारवाडी फाटा येथे अभ्यासिकेच्या दिशादर्शक फलकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक शाळेत ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. वनारवाडीतील हभप अरुण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भजनी मंडळाच्या उपस्थितीत प्राथमिक शाळेपासून ते नियोजित अभ्यासिकेपर्यंत सजविलेल्या पालखीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी दादा देशमुख, जीवन देशमुख, रामदास शिंदे, वसंत थेटे, संतोष कथार, सचिन वडजे यांनी मनोगत व्यक्त करून अभ्यासिकेस शुभेच्छा देऊन फोरमच्या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमास गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तलाठी आळकुटे, प्राथमिक शिक्षक मधुकर आहेर, विलास पेनमहाले उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फोरमचे दिंडोरी तालुका समन्वयक जयदीप गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन विलास जमदाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य भीमराज वाघमारे, संदीप डगळे, फोरमचे समन्वयक जयदीप गायकवाड, प्राथमिक शिक्षक विलास जमदाडे, भाऊसाहेब नांदूरकर, सुनंदा अहिरे, गणपत घोलप, तेजस राऊत यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास ग्रामसेविका आश्विनी पाटील, भास्कर घोलप, रूंजा ठाकरे, गुलाब ठाकरे, शरद भेरे, गोरख डमाळे, रामदास दिवे, जीवन भेरे, बापू भेरे, विश्वास चव्हाण, शरद चव्हाण, संपत ठाकरे, विजय नाईकवाडे, सुकदेव गवारे, दगुनाना घोलप, योगेश घरत, ललिता देशमुख, रेखा डमाळे, आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.